सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'हे' काम उरका, अन्यथा १ जानेवारीपासून तुमचे PAN कार्ड होणार 'बंद'
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
उरले फक्त 8 दिवस आजच करा हे काम नाहीतर तुमचं प्रत्येक सरकारी कामही अडेल, योजनांचाही मिळणार नाही लाभ
advertisement
1/6

आजकाल प्रत्येक गोष्टीसाठी आधार आणि पॅनकार्ड आवश्यक आहे. त्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. बँक खातं उघडण्यापासून ते आयकर भरण्यापर्यंत प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्ड सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. मात्र, जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड अद्याप आधार कार्डाशी लिंक केले नसेल, तर तुमच्याकडे केवळ काही दिवस उरले आहेत.
advertisement
2/6
सरकारने स्पष्ट केले आहे की, ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पॅन-आधार लिंक न केल्यास, १ जानेवारी २०२६ पासून तुमचे पॅन कार्ड बंद करण्यात येईल. तुम्हाला ते सुरू करण्यात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. तुम्हाला नव्याने प्रक्रिया करायला लागू शकते. दंड बसेल तो वेगळाच.
advertisement
3/6
एकदा का पॅन कार्ड निष्क्रिय झाले, की तुमचे दैनंदिन अनेक आर्थिक व्यवहार ठप्प होऊ शकतात. आयकर भरता येणार नाही. लोन घेताना अडचणी येतील, नवीन खातं, क्रेडिट कार्ड घेण्यासाठी अडचणी येतील. शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडमधील व्यवहारांत अडचणी येतील.
advertisement
4/6
तुम्हाला पॅन-आधार लिंक करण्यासाठी कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉपवरून काही मिनिटांत हे काम करू शकता. इन्कम टॅक्सच्या अधिकृत वेबसाईटवर incometax.gov.in लॉगइन करायचं आहे.
advertisement
5/6
होम पेजवर Quick Links विभागात Link Aadhaar वर क्लिक करा. तुमचा पॅन आणि आधार क्रमांक टाका. मोबाईलवर आलेला OTP टाकून व्हेरिफिकेशन पूर्ण करा. याशिवाय तुम्ही SMS करुन देखील आधार पॅन लिंक करु शकता. पण SMS पेक्षा हा पर्याय जास्त चांगला आहे.
advertisement
6/6
जर तुम्ही ३१ डिसेंबरची डेडलाईन चुकवली आणि तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय झाले, तर ते पुन्हा सक्रिय करण्यासाठी 1,000 रुपये दंड भरावा लागेल. दंड भरल्यानंतर पॅन पुन्हा सक्रिय होण्यासाठी ७ ते ३० दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट न पाहता हे काम आजच पूर्ण करणे हिताचे ठरेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'हे' काम उरका, अन्यथा १ जानेवारीपासून तुमचे PAN कार्ड होणार 'बंद'