भाऊ पायलट, बहीण वकील, पण शिक्षणानंतर तरुणीने निवडला शेतीचा मार्ग, फक्त 4 वर्षात कमावले 22 लाख रुपये
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
अनेक ठिकाणी शेती हे अजूनही पुरुषप्रधान क्षेत्र मानले जाते. त्यातल्या त्यात आजच्या महिला नव्हे तर सुशिक्षित तरुणी या शेतीकडे वळणे म्हणजे फार दुर्मिळ. मात्र, एका सुशिक्षित तरुणीने एक क्रांतीकारी पाऊल उचलत मोठा निर्णय घेतला आणि आज ती अनेकांसाठी प्रेरणादायी बनली आहे. या सुशिक्षित तरुणीने शेती करण्याचा निर्णय घेतला आणि फक्त 4 वर्षात तिने तब्बल 22 लाखांपेक्षा जास्त पैसे कमावले आहेत. जाणून घेऊयात तरुणीची यशस्वी आणि प्रेरणादायी कहाणी. (अंजलि सिंह राजपूत, प्रतिनिधी)
advertisement
1/9

अनुष्का जायसवाल असे या तरुणीचे नाव आहे. ती उत्तर प्रदेशातील एका युवा शेतकरी म्हणून आज ओळखली जात आहे. तिने फक्त 23 वर्षे वयात असताना शेती करायला सुरुवात केली. आता तिचे वय 27 वर्षे आहे. फक्त 4 वर्षात तिने तब्बल 22 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे कमावले आहेत.
advertisement
2/9
लखनऊ येथील रहिवासी असलेल्या अनुष्का जायसवाल सोबत लोकल18 च्या टीमने संवाद साधला. यावेळी तिने सांगितले की, तीन वर्षांपूर्वी मी माझा शेतीचा प्रवास सुरू झाला. दिल्लीच्या हिंदू कॉलेजमधून अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले. मला या क्षेत्रात करिअर करायची नव्हती, म्हणून काहीतरी वेगळं करण्याचा विचार करत होते. आधी पालकांशी शेती करण्याविषयी बोलली.
advertisement
3/9
आई-वडिलांनी सांगितले की, जर यात प्रगती करायची असेल तर हे क्षेत्र निवड. मग यानंतर अनुष्काने शेती हे क्षेत्र करिअर म्हणून निवडले. शेती करण्यासाठी सरकारकडून तिला 50 टक्के सबसिडी मिळाली. यातून तिने एक एकरात पॉली हाउस सुरू केले. आता ती आणखी 3 एकर शेती करत आहे. याठिकाणी ती शिमला मिरची, पानकोबी, फुलकोबी आणि इतर अनेक भाज्यांची लागवड करत आहे. यातून तिला चांगला नफाही मिळत आहे.
advertisement
4/9
लखनऊपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर मोहनलालगंजमध्ये तिचे शेत आहे. अनुष्का जायसवाल या तरुणीने सांगितले की, जेव्हा तिने हे क्षेत्र निवडले तेव्हा लोक म्हणाले की काही फायदा होणार नाही.
advertisement
5/9
तोट्याचा सौदा आहे. मुलगी म्हणून शेती कशी करणार? उन्हात कशी काम करणार? मजूरांसोबत कसा व्यवहार असेल? अशा अनेक गोष्टी लोकं म्हणाले. मात्र, लोकांनी इतक्या विविध प्रकारचे प्रतिक्रिया दिल्यानंतर ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली आणि अवघ्या 4 वर्षात 22 लाखांहून अधिक नफा कमावला.
advertisement
6/9
अनुष्का जायसवालने पुढे बोलताना सांगितले की, त्यांच्याजवळ पूर्वजांचे काहीच नव्हते. कारण, त्यांच्या कुटुबीयांची पार्श्वभूमी ही शेतकरी कृषी क्षेत्राशी संबंधित नाही. तिचा भाऊ पायलट आहे. बहीण वकील आहे. वहिनी सॉफ्टवेअर इंजीनिअर आहे. वडील व्यवसाय करतात. तर आई गृहिणी आहे.
advertisement
7/9
अशा परिस्थितीत आधी तिने प्रथम एक एकर जमीन भाडेतत्त्वावर घेतली. नंतर तीन एकर जमीन भाडे तत्त्वावर घेतली. त्यानंतर प्रशिक्षण घेऊन शेती करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिने आपल्या मजुरांनाही प्रशिक्षण दिले.
advertisement
8/9
तसेच जास्तीत जास्त तंत्रज्ञान वापरले आणि त्याद्वारे कमी जमिनीवरही अधिक उत्पादन कसे करता येईल हे समजून घेतले. याचा परिणाम असा झाला की, एका एकरात 50 टन इंग्रजी काकडीचे उत्पादन झाले.
advertisement
9/9
तर लाल पिवळी भोपळी मिरचीचे पीक 35 टन होते. इतकेच नव्हे तर बाजारात शिमला मिरचीचा भावही चांगलाच मिळत आहे. त्याच्या शेतात पिकवलेली भाजी लखनऊच्या सर्व बाजारपेठेत आणि अनेक मोठ्या शॉपिंग मॉल्समध्ये विकली जात आहे. त्यामुळे चांगला नफा मिळत आहे, असेही तिने सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/कृषी/
भाऊ पायलट, बहीण वकील, पण शिक्षणानंतर तरुणीने निवडला शेतीचा मार्ग, फक्त 4 वर्षात कमावले 22 लाख रुपये