TRENDING:

भाडेतत्त्वावर घेतली 20 एकर जमीन, 9 बिघ्यातून तीन महिन्यात घेतला तब्बल 14 लाख रुपये नफा, नेमका कसा?

Last Updated:
भारत हा कृषीप्रधान देश आहे. याठिकाणी विविध पिकांची शेती केली जाते. यातच आज आपण एका शेतकऱ्याची कहाणी जाणून घेणार आहोत, ज्यांनी भाड्याने जमीन घेऊन फक्त तीन महिन्यातच 14 लाख रुपयांचा नफा कमावला आहे. शिवशरण प्रसाद असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते झारखंडच्या हजारीबाग येथील चुरचू येथील रहिवासी आहेत. त्यांनी 5 एकरमध्ये टरबूजाची शेती केली. तसेच त्यातून मोठा प्रमाणात नफा मिळवला आहे.
advertisement
1/5
भाडेतत्त्वावर घेतली 20 एकर जमीन, 9 बिघ्यातून तीन महिन्यात घेतला तब्बल 14 लाख...
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, अनेक शेतकऱ्यांमध्ये चुकीची माहिती आहे की टरबूजची शेती फक्त वालुकामय जमिनीत होऊ शकते. मात्र, असे नाही. पहिल्या वर्षीच त्यांनी टरबूजची शेती करुन चांगला नफा कमावला आहे.
advertisement
2/5
टरबूज लागवडीसाठी उन्हाळ्यात त्याला पाणी देणे, सर्वात मोठे आव्हान आहे. मुळांव्यतिरिक्त कुठेही पाणी गेल्यास पीक खराब होण्याची भीती आहे. तर पाऊस आणि गारपीट झाली तर पिकाची नासाडी होते.
advertisement
3/5
त्यांनी ज्योती वाणाच्या टरबूजाच्या बियाणांची लागवड केली. आतापर्यंत 1200 क्विंटलपेक्षा जास्त टरबूजची तोडणी झाली आहे. आशा आहे की, 400 क्विंटल तोडणी आणखी येईल. टरबूजाचा दर उन्हाळ्याच्या हंगामावर अवलंबून असतो. उन्हाळा असेल तर टरबूज 15 रुपये किलोने विकले जाते, असे ते म्हणाले.
advertisement
4/5
ऊन कमी झाल्यास टरबुजाचा दर सात ते आठ रुपयांपर्यंत जातो. यंदा उन्हाचा तडाखा जास्त असल्याने त्यांनी सरासरी 12 रुपये किलोने टरबूज विकले. पश्चिम बंगाल आणि ओरिसा येथील व्यापारी येथे पिकवलेले टरबूज घेऊन जातात, अशी माहितीही त्यांनी दिली.
advertisement
5/5
शेतीसाठी त्यांनी 20 एकर जमीन भाडेतत्त्वावर घेतली आहे. यासाठी ते वर्षाला एकरी 10,000 रुपये भाडे देतात. यामध्ये 5 एकरवर टरबूजाची लागवड करण्यासाठी त्यांना अंदाजे 3 लाख रुपये खर्च आला. आतापर्यंत त्यांनी 13 ते 14 लाख रुपयांचे टरबूज विकले आहे. या माध्यमातून ते 15 जणांना ते शेतीत रोजगारही देत ​​आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/कृषी/
भाडेतत्त्वावर घेतली 20 एकर जमीन, 9 बिघ्यातून तीन महिन्यात घेतला तब्बल 14 लाख रुपये नफा, नेमका कसा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल