तब्बल 3 फूट लांबीची कणसे, शेतकऱ्याने बाजरीच्या शेतीतून केली कमाल, पाहा PHOTOS
- Published by:News18 Marathi
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने बाजरी शेतीतून कमाल केलीय. बाजरीचे पीक जोमदार आले असून तब्बल 3 ते साडेतीन फूट लांबीची कणसे आली आहेत.
advertisement
1/6

सध्याच्या काळात शेतकरी आपल्या शेतात विविध प्रयोग करत असतात. व्यापारी पिकांमुळे ज्वारी, बाजरीच्या शेतीचे प्रमाण कमी होत आहे. परंतु, <a href="https://news18marathi.com/maharashtra/jalna/">जालना</a> जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने बाजरी शेतीतून कमाल केलीय. नितीन काळे यांनी तुर्की बाजरीची आपल्या शेतात लागवड केली. विशेष म्हणजे बाजरीचे पीक जोमदार आले असून तब्बल 3 ते साडेतीन फूट लांबीची कणसे आली आहेत. ही कणसे सध्या पंचप्रकोशीतील शेतकऱ्यांसाठी चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय ठरत आहेत.
advertisement
2/6
नितीन काळे हे जालना जिल्ह्यातील दहिफळे गावचे शेतकरी आहेत. त्यांनी जालन्यातीलच शेतकरी अशोक पांढरे यांच्या शेतातील तुर्की व्हरायटीच्या ज्वारीची पाहणी केली होती. पांढरे यांच्या शेतात साडेतीन ते चार फुटापर्यंत लांबी असलेली बाजरीची कणसे आली होती. त्यामुळे काळे यांनी हे बियाणे खरेदी करून 8 जानेवारी 2024 रोजी ट्रॅक्टरच्या सहाय्याने बाजरीची पेरणी केली.
advertisement
3/6
बाजरीची दोन फुटांच्या अंतरावर ट्रॅक्टरने पेरणी केली. पण या बाजरीच्या पिकाला पाखरे जास्त खात असल्याने त्यामध्ये अर्धा किलो केसाळ व्हरायटीच्या बाजरीचे बियाणे देखील पेरले. एकरी एक किलो तुर्की व्हरायटीची बाजरी व अर्धा किलो केसाळ बाजरीची पेरणी करण्यात आली.
advertisement
4/6
एक महिन्यानंतर या बाजरीला 20 20 0 13 या खताची एक बॅग आणि अर्धा किलो युरिया याप्रमाणे एकरी खत देण्यात आले. बाजरीची उगवण होत असताना मर रोग लागल्याने त्यावर एक कीटकनाशकाची फवारणी देखील केली. आतापर्यंत या बाजरीला तीन वेळा पाणी देण्यात आले. दोन वेळा तुषार सिंचनाच्या माध्यमातून तर एक वेळा पाठ पाणी देण्यात आल्याचे काळे सांगतात.
advertisement
5/6
आतापर्यंत आपण बाजरीचं कणीस एक ते दीड फुटापर्यंत पाहिलं असेल. पण काळे यांच्या शेतात बाजरीचं पीक चांगलं आलंय. एक कणीण तब्बल तीन ते साडेतीन फूट लांबीचं आहे. या तुर्की बाजरीतून एकरी 35 ते 40 क्विंटल बाजरीचे उत्पन्न होऊ शकते. पण उन्हाळी बाजरी आणि केसाळ वाणामुळे काळे यांना 25 ते 30 क्विंटल बाजरी होण्याचा अंदाज आहे.
advertisement
6/6
तुर्की व्हरायटीच्या बाजरीची वाढ ही सामान्य बाजरी पेक्षा थोडी अधिक आहे. त्याचप्रमाणे या बाजरीचा कालावधी देखील सामान्य बाजरी पेक्षा 15 दिवसांनी अधिक आहे. यामुळे या बाजरीला पाण्याची एक पाळी अधिक द्यावी लागते. असे शेतकरी नितीन काळे यांनी सांगितलं. या बाजरीच्या बियाणांविषयी अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे मागणी केली आहे. शेतकऱ्यांना माफक दरात हे बियाणे उपलब्ध करून देणार असल्याचे नितीन काळे यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/कृषी/
तब्बल 3 फूट लांबीची कणसे, शेतकऱ्याने बाजरीच्या शेतीतून केली कमाल, पाहा PHOTOS