TRENDING:

भाला, बिर्याणी अन् मांडगा, पुण्यातील शेतकऱ्याने लावलेत जगभरातील 16 प्रकारचे बांबू

Last Updated:
बांबूची शेती फायद्याची ठरत असल्याने काही शेतकरी या शेतीकडे वळत आहेत. पुण्यातील एका शेतकऱ्याने तब्बल 16 प्रकारचे बांबू लावगले आहेत.
advertisement
1/7
भाला, बिर्याणी अन् मांडगा, पुण्यातील शेतकऱ्याने लावले जगभरातील 16 प्रकारचे बांबू
सध्याच्या काळात शेतकरी आपल्या शेतात विविध प्रयोग करत असतात. पुणे जिल्ह्यातील काही शेतकरी थेट परदेशातील फळे आणि पिकांची शेती करत आहेत. आता <a href="https://news18marathi.com/pune/">पुण्यातील</a> दारुंब्रेचे शेतकरी समीर वाघोले यांनी आपल्या शेतात तब्बल 16 प्रकारचे बांबू लावले आहेत. बांधकामापासून ते विणकामापर्यंत विविध उपयोग असणाऱ्या या बांबूंचा आकार आणि उंचीही वैशिष्ट्यपूर्ण आहे.
advertisement
2/7
पुण्यातील दारुंब्रे येथे आनंदमळा असून याठिकाणी समीर यांनी नैसर्गिक शेती केलीय. यामध्ये त्यांनी जगभरातील विविध प्रकारच्या बांबूंची लागवड केलीय. या प्रत्येक प्रकारच्या बांबूचा उपयोग भिन्न प्रकारचा आहे. तसेच शेतीला खतासाठीही त्याचा फायदा होतो, असे वाघोले सांगतात.
advertisement
3/7
जायंट बर्मा हा जगातील सर्वात उंच बांबू पैकी एक आहे. फिलिपिन्स, म्यानमार या ठिकाणी हा बांबू आढळतो. त्याची उंची साधारण 100 फुटापर्यंत जाते. ऑलिव्हरी म्हणजेच भाला बांबूचं खोड सरळ वर वाढत जातं. त्याचा उपयोग पूर्वीच्या काळी भाला बनवण्यासाठी तसेच विविध शस्त्रे बनवण्यासाठी केला जात होता. या बांबूचे लाकूड मजबूत असते, असे शेतकरी वाघोले सांगतात.
advertisement
4/7
महाराष्ट्रामध्ये सहजपणे आढळणारा मांडगा बांबू हा भरीव असतो. त्याचा उपयोग हा झोपड्या तयार करण्यासाठी केला जातो. हा बांबूचा प्रकार सर्वत्र पाहायला मिळतो. तसेच छोट्या बांबूचा वापर भिंत बनवण्यासाठीही केला जातो.
advertisement
5/7
मल्टिप्लेक्स जातीचा वापर हा कुंपन करण्यासाठी केला जातो. तर अगदी मोठं खोड असणारा बिर्याणी बांबू देखील या ठिकाणी लावण्यात आला आहे.
advertisement
6/7
बांबूची शेती ही अत्यंत फायदेशीर मानली जाते. बांबूपासून विविध वस्तू बनवल्या जातात. बांधकाम, विणकाम, हस्तकला, फर्निचर, बायो सीएनजी, प्ले बोर्ड, चारा, शेतीसाठी काठ्या आदीसाठी बांबूचा वापर होतो.
advertisement
7/7
बांबूच्या पानापासून सिलिका मिळते. तसेच शेतीसाठी खत देखील मिळते. शेतीसाठी हे बांबू अत्यंत फायदेशीर असून शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर त्याची लागवड करावी, असे आवाहनही वाघोले करतात. (प्राची केदारी, प्रतिनिधी)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/कृषी/
भाला, बिर्याणी अन् मांडगा, पुण्यातील शेतकऱ्याने लावलेत जगभरातील 16 प्रकारचे बांबू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल