1 एकर रेशीम शेतीतून तरुण शेतकरी झाला लखपती; नोकरी सोडून कसं मिळवलं यश?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
साताऱ्यातील धनंजय मोहिते यांनी नोकरी सोडून रेशीम शेतीचा प्रयोग केला असून यामधून त्यांना वर्षांकाठी लाखोंची कमाई होत आहे.
advertisement
1/6

महाराष्ट्रातील अनेक शेतकरी अजूनही पारंपारिक शेतीलाच प्राधान्य देतात. मात्र काहीजण पारंपरिक शेती न करता नवनवीन प्रयोग करतात. या नवीन प्रयोगातून यश मिळवत मोठं आर्थिक फायदाही त्यांना होतो. साताऱ्यातील धनंजय मोहिते यांनी नोकरी सोडून रेशीम शेतीचा प्रयोग केला असून यामधून त्यांना वर्षांकाठी लाखोंची कमाई होत आहे.
advertisement
2/6
साताऱ्यातील संगम माहुली हे धनंजय शिवाजी मोहिते यांचे गाव आहे. पुणे येथून 2015 मध्ये एमसीएची पदवी घेतली. त्यानंतर धनंजय यांनी पुणे येथील आयटी कंपनीत ग्राफिक डिझाईन विभागात नोकरी सुरु केली. मात्र, वडिलांच्या निधनानंतर नोकरी सोडून त्यांना घरची जबाबदारी सांभाळण्यासाठी गावी यावे लागले.
advertisement
3/6
वडिलोपार्जित असणाऱ्या एक एकर शेतीमध्ये वडील हे ऊसाचे पीक घेत होते. शेती फक्त एक एकरच त्यातूनच घरची जबाबदारी त्यामुळे अनेक आव्हान त्यांचा समोर होती. त्यामुळे कमी गुंतवणूक असलेल्या रेशीम शेतीचा हा उत्तम व्यवसाय आहे हे त्यांच्या अभ्यासातून निदर्शनात आले. त्यामुळे धनंजय यांनी रेशीम शेती करण्याचा पर्याय निवडला.
advertisement
4/6
त्यांनतर त्यांनी वडिलोपार्जित एक एकर क्षेत्राचा वापर करून शेतात तुतीच्या झाडाची लागवड केली. त्याचबरोबर 50 बाय 20 फुट लांबी रुंदीचे शेड बांधून सुरू केला रेशीम उद्योग सुरु केला.
advertisement
5/6
रेशीम शेतीमधून ते एका बॅचला 40 ते 45 हजार रुपये एवढे उत्पन्न ते घेत असतात. यामधून त्यांना वर्षांकाठी लाखोंची कमाई होत आहे.
advertisement
6/6
एका बॅचला 40 ते 45 हजार रुपये एवढे उत्पन्न मला रेशीम शेतीमधून मिळते. नोकरी पेक्षा मी या व्यवस्यातून चांगली कमाई करत आहे. त्यामुळे नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय असणे खूप गरजेचे असते. दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतः मालक म्हणून काम केले पाहिजे आणि आपली प्रगती करता आली पाहिजे, असं धनंजय मोहिते यांनी सांगितले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/कृषी/
1 एकर रेशीम शेतीतून तरुण शेतकरी झाला लखपती; नोकरी सोडून कसं मिळवलं यश?