लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? उपमुख्यमंत्री अजित पवार स्पष्टच बोलले
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
महायुती सरकारकडून निवडणुकीच्या तोंडावर राबवण्यात आलेली लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात गेमचेंजर ठरली.
advertisement
1/7

नुकतंच राज्याचं अर्थसंकल्प सादर झालं. यामध्ये लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयांबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. त्यामुळे विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला. महिलांच्या तोंडाला पान पुसण्याचं काम आहे. ही योजना बंद होणार असा आरोपही करण्यात आला.
advertisement
2/7
महायुती सरकारकडून निवडणुकीच्या तोंडावर राबवण्यात आलेली लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात गेमचेंजर ठरली. लाडक्या बहि‍णींनी महायुतीला पाठिंबा दिल्याने पुन्हा सत्ता स्थापन करण्यात महायुतीला यश आलं आहे.
advertisement
3/7
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आता त्यावर विधानसभेत अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. 2100 रुपये लाडक्या बहिणींना नक्की मिळणार असं अजित पवार म्हणाले.
advertisement
4/7
लाडक्या बहिण संदर्भात आम्हाला आपुलकी आहे. गांडूळासाखी अवस्था आहे ते कोणत्या तोंडाने चालत हे कळत नाही. पाच वर्षाचा वचननामा असतो. आम्ही वचननाम्यात जे वचन लाडक्या बहिणींना दिलं आहे ते पूर्ण करणार.
advertisement
5/7
लाडक्या बहिणींच्या खात्यावर 2100 रुपये नक्की येणार. त्यासाठी लाडक्या बहिणींना थोडी वाट पाहायला लागेल. विरोधक तर तर कोर्टात गेले होते. तुम्ही तर चुनावी जुमला म्हणाला होतात. आम्ही दोन शासन निर्णय काढले.
advertisement
6/7
लाडक्या बहिणींच्या लाभार्थी वयाची अट बदलली. 60 वय ऐवजी 65 केले. घाईगडबडीत काही भगीनींची अर्थिक परिस्थिती चांगली असतानाही या योजनेचा लाभ घेता. या संदर्भात आवाहन केल्यानंतर महिलांनी पैसे परत केले.
advertisement
7/7
ही योजना बंद होणार नाही. विरोधक जे बोलत आहेत त्यात काही तथ्य नाही. लाडकी बहीण या योजनेत आम्ही दुरुस्ती करणार मात्र बंद करणार नाही असं उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? उपमुख्यमंत्री अजित पवार स्पष्टच बोलले