TRENDING:

Share Market: काही तासांत बुडले 200,00,00,00,000 रुपये, भारतातल्या IT सेक्टरमध्ये हाहाकार, कारण काय?

Last Updated:
Anthropic AI च्या ऑटोमेशन टूलमुळे TCS, Infosys, HCL Tech, Wipro, Tech Mahindra यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण, IT क्षेत्रात AIमुळे अस्तित्वाचा धोका निर्माण झाला.
advertisement
1/6
काही तासांत बुडले 200,00,00,00,000 रुपये, भारतातल्या IT सेक्टरमध्ये हाहाकार
शेअर बाजारात आज वरवर जरी शांतता दिसत असली, तरी आयटी कंपन्यांच्या गोटात मात्र मोठी खळबळ उडाली आहे. निमित्त ठरलंय ते म्हणजे 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'ची (AI) वाढती ताकद. एआय आता फक्त मदतीला न राहता, चक्क माणसांची जागा घेणार की काय? या एका धास्तीने गुंतवणूकदारांनी आयटी शेअर्सची तुफान विक्री केली. परिणामी, दिग्गज भारतीय आयटी कंपन्यांचे तब्बल २ लाख कोटी रुपये अवघ्या काही तासांत मातीमोल झाले.
advertisement
2/6
या सर्व पडझडीचं मूळ अमेरिकेतली Anthropic AI या कंपनीत आहे. त्यांनी असं एक ऑफिस ऑटोमेशन टूल आणलंय, जे व्यवसायातील मोठी कामं स्वतःहून पूर्ण करू शकतं. "जर उद्या एआय स्वतःच सॉफ्टवेअर बनवायला लागलं आणि बिझनेस सांभाळू लागलं, तर मग आपल्या आयटी कंपन्यांना काम कोण देणार?" या एका साध्या पण भीषण प्रश्नाने जगभरातील मार्केट हादरलं.
advertisement
3/6
या वादळाचा सर्वात मोठा तडाखा बसला तो देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या TCS ला. कंपनीचं मार्केट कॅप तब्बल ७० हजार कोटींनी घटलं. त्यापाठोपाठ इन्फोसिसने ५४ हजार कोटी गमावले, तर HCL Tech चे २६ हजार कोटी साफ झाले.
advertisement
4/6
विप्रो आणि टेक महिंद्राची अवस्थाही फार वेगळी नव्हती. थोडक्यात सांगायचं तर, आयटी क्षेत्रात आज २००८ च्या मंदीनंतरची सर्वात मोठी भीती पाहायला मिळाली. गंमत म्हणजे, ज्या कंपन्या कम्प्युटरचे भाग बनवतात, त्यांना या एआयमुळे फायदा होतोय.
advertisement
5/6
ज्या कंपन्या 'सर्व्हिस' किंवा सॉफ्टवेअरच्या जोरावर चालतात, त्यांच्या अस्तित्वावर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. जानेवारी महिन्यातच या सेक्टरमध्ये १५ टक्क्यांची घसरण झाली आहे. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण पिढीसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी हा केवळ शेअर्सचा आकडा नसून, येणाऱ्या काळातील बदलाची एक मोठी धोक्याची घंटा आहे.
advertisement
6/6
आशियाई टेक मार्केटमधील चिप आणि हार्डवेअर बनवणाऱ्या कंपन्यांना मात्र याचा मोठा फटका बसला नाही, कारण AI चालवण्यासाठी लागणारे हार्डवेअर याच कंपन्या पुरवतात. मात्र, सॉफ्टवेअर आणि सर्व्हिस ओरिएंटेड कंपन्यांसाठी AI आता खरोखरचं अस्तित्वाचं संकट आलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Share Market: काही तासांत बुडले 200,00,00,00,000 रुपये, भारतातल्या IT सेक्टरमध्ये हाहाकार, कारण काय?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल