TRENDING:

एक एप्रिलपासून ATM मधून पैसे काढणं महागणार! 'या' बँकांनी केले मोठे बदल

Last Updated:
उद्या म्हणजेच 1 एप्रिल 2026 पासून बँकांच्या महत्त्वाच्या नियमांत बदल होणार आहेत. यामध्ये एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमातही काही बदल होणार आहेत. चला यात कोणकोणत्या बँकांचा समावेश आहे पाहूया...
advertisement
1/7
एक एप्रिलपासून ATM मधून पैसे काढणं महागणार! 'या' बँकांनी केले मोठे बदल
मुंबई : येत्या 1 एप्रिल 2026 पासून देशभरात अनेक आर्थिक नियमांमध्ये बदल होणार आहेत. कारण नवं आर्थिक वर्ष सुरू होतंय. यामध्ये आता काही बँकांच्या एटीएमसंबंधित नियमांमध्येही बदल होणार आहेत. HDFC Bank, Punjab National Bank आणि Bandhan Bank आपल्या एटीएम नियमांमध्ये बदल करणार आहे. यात फ्री ट्रांझेक्शनवर लावल्या जाणाऱ्या चार्जेंचसा समावेश आहे. हे नवे नियम लागू झाल्यानंतर ग्राहकांना पहिल्यापेक्षा जास्त प्लॅनिंगसह एटीएमचा वापर करावा लागेल. कारण ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त ट्रांझेक्शन केल्यावर अतिरिक्त चार्ज द्यावं लागेल.
advertisement
2/7
या बदलांचा थेट परिणाम वारंवार एटीएमचा वापर करणाऱ्या लोकांवर होईल. अशा ग्राहकांना आता आपल्या कॅश विड्रॉल आणि बॅलेन्स चेक सारख्या गोष्टींना मर्यादित ठेवावं लागेल. ज्यामुळे अतिरिक्त चार्जेसपासून बचाव करता येईल. चला पाहूया कोणकोणत्या बँकांनी एटीएम चार्जेंसमध्ये बदल केले आहेत.
advertisement
3/7
HDFC Bank चे एटीएम चार्ज : HDFC Bank मध्ये सर्वात मोठा बदल UPI मधून कॅश काढण्याविषयी होईल. आता यूपीआय आधारित कार्डलेस कॅश विड्रॉलही सामान्य एटीएम ट्रांझेक्शन प्रमाणे गणले जाईल. सेव्हिंग्स आणि सॅलरी अकाउंटच्या ग्राहकांना दरमहिना आपल्या एचडीएफसीच्या एटीएमवर 5 फ्री ट्रांजेक्शन मिळतील. दुसऱ्या बँकांच्या एटीएमवर मेट्रो शहरांमध्ये 3 फ्री आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये 5 फ्री ट्रांझेक्शन मिळतील. फ्री लिमिट संपल्यानंतर प्रत्येक ट्रांझेक्शनवर 23 रुपये आणि टॅक्स चार्ज लागेल. यापूर्वी यूपीआय विड्रॉल वेगळे गणले जात होते. आता ते फ्री लिमिटमध्ये सामिल झाले आहेत.
advertisement
4/7
पीएनबी बँकेशी संबंधित बदल : पीएनबीने अनेक डेबिट कार्ड्सवर रोज कॅश विड्रॉलची लिमिट कमी केली आहे. प्लॅटिनम, गोल्ड आणि बिझनेस कार्ड्सवर पहिलेच 1 लाख पर्यंत पैसे काढले जाऊ शकत होते. आता ते कमी करून 50,000 रुपये झाले आहे. सिलेक्ट आणि सिग्नेचर कार्ड्सवर पहिले 1.5 लाख रुपये लिमिट होते. आता 75,000 रुपये केली आहे. म्हणजेच काही कार्ड्सवर लिमिट अर्धी करण्यात आलीये.
advertisement
5/7
बंधन बँकेच्या एटीएम नियमांत बदल : बंधन बँकेनेही फ्री ट्रांझेक्शनची संख्या बदलली आहे. आपल्या बँकेच्या एटीएमवर दरमहा 5 फ्री फायनेंशियल ट्राझेक्शन मिळतील. तर नॉन-फायनेंशियल ट्रांझेक्शनवर अमर्यादित राहतील. दुसऱ्या बँकांच्या एटीएमवर मेट्रो शहर (मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद इत्यादी) मध्ये 3 फ्री आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये 5 फ्री ट्रांझेक्शन मिळतील. लिमिट संपल्यानंतर बँकेच्या नियमानुसार चार्ज लागेल.
advertisement
6/7
हे बदल RBI च्या मार्गदर्शक तत्वानुसार केले गेलेय. बँका म्हणतात की, यामुळे एटीएमचा अनावश्यक वापर कमी होईल. यासोबतच डिजिटल ट्रांझेक्शनला प्रोत्साहन मिळेल. ग्राहकांना सल्ला आहे की, त्यांनी आपला महिना सुरू होण्यापूर्वी फ्री लिमिट लक्षात ठेवाव्यात. गरजेपेक्षा जास्त एटीएम वापरल्यावर प्रत्येकवेळी 23 रुपये आणि जीएसटी चार्ज द्यावा लागू शकतो.
advertisement
7/7
बँका ग्राहकांसाठी आवश्यक माहिती आहे की, यूपीआय, नेट बँकिंग किंवा मोबाईल अॅपने पैसे ट्रान्सफर केले जाऊ शकतील. आपल्या बँकेच्या अॅप किंवा वेबसाइटवर नवीन लिमिट आणि चार्जेस चेक करा. मेट्रो आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये दुसऱ्या बँक एटीएम यूज करताना फरक लक्षात ठेवा. 1 एप्रिलपासून हे नियम लागू होतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
एक एप्रिलपासून ATM मधून पैसे काढणं महागणार! 'या' बँकांनी केले मोठे बदल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल