पती बीटेक, तर पत्नी एमबीए, नोकरी करता-करता क्यूट कपलनं सुरू केलं स्टार्टअप, नावही यूनिक
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
आज आम्ही तुम्हाला एका अशा पती पत्नीची कहाणी सांगणार आहोत, जे उच्चशिक्षित आहेत, तसेच नोकरी करता करता आपल्या स्वत:चा व्यवसायही करत आहेत. माझा पहिला क्रश मोमोज या यूनिक नावाने त्यांनी मोमोज विक्रीचा स्टॉल सुरू केला आहे. त्यांच्या या स्टॉलला सर्वांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. (आग्रा/हरिकांत, प्रतिनिधी)
advertisement
1/7

स्ट्रेस मोमोज, सिस्टर मोमोज यानंतर आता “मेरा फस्ट क्रश मोमोज” हे नवीन स्टॉल खवय्यांच्या भेटीला आले आहे. आग्रा एमडी जैन इंटर कॉलेज, संजय प्लेस, आजाद पेट्रोल पंपासमोर एक सुंदर पती-पत्नीने “मेरा फर्स्ट क्रश मोमोज” या नावाने मोमोजचा स्टॉल सुरू केला आहे.
advertisement
2/7
दोन्ही पती-पत्नीने बीटेक आणि एमबीएचे शिक्षण घेतले आहे. तसेच सोबतच ते नोकरीही करतात आणि संध्याकाळी जेव्हा त्यांना रिकामा वेळ मिळतो. त्यादरम्यान, ते आपला व्यवसाय चालवतात.
advertisement
3/7
दीपक सारस्वत आणि साक्षी गौतम असे या पती पत्नीचे नाव आहे. त्यांचे लग्न 1 वर्षांपूर्वी झाले. ते आग्राच्या रामबाग येथील रहिवासी आहेत. दिपक सारस्वत याने हिंदुस्थान कॉलेज येथून बीटेक केले तर त्याची पत्नी साक्षी गौतम हिने एमबीएचे शिक्षण घेतले आहे. सध्या ती उत्तम इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
advertisement
4/7
एके दिवशी पती-पत्नी दोघेही सोशल मीडियावर व्हिडिओ स्क्रोल करत होते. त्यानंतर त्यांनी मोमोजच्या स्टॉल्सचा व्हिडिओ पाहिला. येथूनच त्यांच्या मनात मोमोज स्टार्टअप सुरू करण्याचा विचार आला. खूप संशोधन केल्यानंतर त्यांनी मेरा फर्स्ट क्रश मोमोज नावाचा फूड स्टॉल सुरू केला, असे साक्षीने सांगितले.
advertisement
5/7
लोकल18 शी बोलताना हे दाम्पत्य म्हणाले की, लोकांना मोमोज खाणे किती आवडते, हे आम्ही पाहत आहोत. मोमोजसाठी तरुणाई मोठी पसंती देत आहेत. ज्याप्रकारे एका मुलीचा मुलावर आणि मुलाचा मुलीवर क्रश असतो, त्याप्रकारे या तरुणाईचा क्रश आता मोमोज बनला आहे.
advertisement
6/7
लोकांना हे नावही आवडत आहे. सायंकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत याठिकाणी मोठी गर्दी असते. आता त्यांच्या स्टॉलवर 5 प्रकारचे मोमोज मिळतात. त्यामध्ये लोकांना क्रिस्पी मोमोज सर्वात जास्त आवडत आहेत. या स्टार्टअपच्या माध्यमातून 7 दिवसात त्यांची चांगली कमाई होत असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
7/7
नोकरीसोबत व्यक्ती आपले स्टार्टअप सुरू करू शकतो. एक्स्ट्रा इनकमचा हा एक चांगला स्त्रोत आहे. नोकरी कधीपर्यंत राहील हे सांगता येत नाही. मात्र, तुमचा व्यवसाय हा कायम राहील. यासाठी नोकरी करत असताना वेळ काढून आपल्या स्टार्टअपला वेळ द्यावा, असा सल्लाही साक्षी आणि दीपक या दोघांनी दिला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
पती बीटेक, तर पत्नी एमबीए, नोकरी करता-करता क्यूट कपलनं सुरू केलं स्टार्टअप, नावही यूनिक