TRENDING:

मार्च महिन्यात १५ दिवस बंद राहणार बँक, कामाचं नियोजन करण्याआधी पाहा RBI ने दिलेली सुट्ट्याची लिस्ट

Last Updated:
मार्च २०२६ मध्ये होळी, ईद, गुढीपाडवा, रामनवमी, महावीर जयंतीसह अनेक सणांमुळे विविध राज्यांत बँकांना मोठ्या सुट्ट्या असतील. डिजिटल बँकिंग आणि UPI सुरू राहतील.
advertisement
1/7
मार्च महिन्यात १५ दिवस बंद राहणार बँक, कामाचं नियोजन करण्याआधी पाहा RBI ने दिलेल
मार्च २०२६ हा महिना बँकिंग व्यवहारांसाठी खूप धावपळीचा ठरू शकतो. या महिन्यात होळी, ईद, गुढीपाडवा आणि रामनवमी असे मोठे सण येत असल्याने देशातील विविध राज्यांत बँकांना मोठ्या सुट्ट्या असणार आहेत. जर तुम्हाला बँकेत जाऊन काही महत्त्वाचे काम पूर्ण करायचे असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
advertisement
2/7
मार्च २०२६ मध्ये एकूण ५ रविवार १, ८, १५, २२ आणि २९ मार्च येत आहेत. याशिवाय, महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवारही बँका बंद राहतील. सण आणि साप्ताहिक सुट्ट्या मिळून महिन्यातील जवळपास निम्मे दिवस बँकांचे कामकाज होणार नाही.
advertisement
3/7
२ मार्च होलिका दहन निमित्त उत्तर प्रदेशात बँका बंद राहतील. ३ मार्च रोजी धुळवड, डोल जात्रा आणि अटुकल पोंगाल निमित्त महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये सुट्टी असेल. ४ मार्च रोजी होळीच्या मुख्य सणानिमित्त दिल्ली, गुजरात, उत्तराखंड, ओडिशामध्ये बँका बंद राहतील.
advertisement
4/7
१३ मार्चला चापचार कुट निमित्त फक्त मिझोरममध्ये सुट्टी असेल. १७ मार्चला शब-ए-कद्र निमित्त जम्मू-काश्मीरमध्ये बँका बंद राहतील. १९ मार्च रोजी गुढीपाडवा, उगादी आणि तेलगू नववर्षा निमित्त महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि गोवा या राज्यांत बँकांना सुट्टी असेल.
advertisement
5/7
२०-२१ मार्च रोजी ईद-उल-फितर निमित्त महाराष्ट्र, दिल्ली, यूपी आणि गुजरातसह देशातील बहुतांश राज्यांत बँका बंद राहतील. २६-२७ मार्च रोजी रामनवमी निमित्त महाराष्ट्र, यूपी, एमपी, बिहार आणि झारखंडसह अनेक राज्यांत बँकिंग सेवा दोन दिवस विस्कळीत राहतील.
advertisement
6/7
३१ मार्च रोजी महावीर जयंती निमित्त दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र आणि बिहारमध्ये बँका बंद राहतील. बँकांच्या शाखा बंद असल्या तरी डिजिटल बँकिंग सेवा आणि UPI पूर्णपणे चालू राहतील.
advertisement
7/7
पैसे ट्रान्सफर करणे किंवा बिले भरण्यासाठी तुम्ही या सेवांचा वापर करू शकता. मात्र, चेक क्लिअरन्स आणि मोठी रोख रक्कम काढणे यांसारख्या कामांसाठी तुम्हाला आधीच नियोजन करावे लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
मार्च महिन्यात १५ दिवस बंद राहणार बँक, कामाचं नियोजन करण्याआधी पाहा RBI ने दिलेली सुट्ट्याची लिस्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल