गृहिणीने लढवली शक्कल, गावातच सुरू केला फायद्याचा बिझनेस, फक्त 4 महिन्यात लाखात कमाई
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Village Business: नोकरीच्या शोधात अनेकजण शहर गाठतात. परंतु, जालन्यातील एक महिला गावातच स्वत:चा दालमिलचा व्यवसाय करून लाखोंची कमाई करतेय.
advertisement
1/5

ग्रामीण भागात शहरी भागाच्या तुलनेत रोजगाराच्या संधी कमी प्रमाणात असतात. मात्र काहीजण गावात राहूनच उत्पन्नाचे वेगवेगळी फंडे शोधत असतात. विशेष म्हणजे त्यातून त्यांना भरघोस कमाई देखील होत असते.
advertisement
2/5
जालना जिल्ह्यातील पिरकल्याण येथील घोडके दांपत्याने गावात स्वत:चा व्यवसाय सुरू केलाय. संगीता घोडके व अर्जुन घोडके यांनी गावातच दालमिल उद्योग उभारला असून ते शेतकऱ्यांना तूर व हरभऱ्याची डाळ तयार करून देतात. तसेच डाळ विक्रीतूनही ते लाखोंची कमाई करत आहेत.
advertisement
3/5
संगीता घोडके उमेद अभियानाच्या माध्यमातून वेगवेगळी कामे करतात. त्यांच्याकडे दालमिल उद्योगाबरोबरच द्राक्ष शेती, गोड्या पाण्यातील मत्स्य पालन, शेळीपालन असे व्यवसाय आहेत. या सर्व व्यवसायांच्या माध्यमातून त्या वर्षाकाठी 10 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न कमवतात.
advertisement
4/5
घोडके यांचा दालमिल व्यवसाय हा केवळ चार महिने असतो. शेतकऱ्यांना 800 रुपये प्रति क्विंटल या दराने तुरीपासून डाळ तयार करून दिली जाते. या माध्यमातून केवळ 4 महिन्यात एक लाखाचा नफा राहतो. तर स्वतः तूर खरेदी करून त्यापासून डाळ निर्मिती आणि विक्री करून देखील लाखभर रुपये राहतात.
advertisement
5/5
“ग्रामीण भागात उद्योगाच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध असल्या तरी या संधींचा शोध घेऊन योग्य दिशेने काम केलं तर चांगला उद्योग उभारता येतो. मला डाळीसाठी मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स येत आहेत. त्यामुळे यंदा तब्बल 70 क्विंटल डाळ तयार केलीये. तर अजून 170 ते 180 क्विंटल दाळ निर्मितीचे उद्दिष्ट आहे, असे संगीता घोडके यांनी सांगितलं. (नारायण काळे, प्रतिनिधी)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
गृहिणीने लढवली शक्कल, गावातच सुरू केला फायद्याचा बिझनेस, फक्त 4 महिन्यात लाखात कमाई