कूलरमध्ये 'हे' संकेत दिसल्यास लगेच करा दुरुस्त, अन्यथा होऊ शकतं शॉर्ट सर्किट
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Cooler Tips and Tricks: उन्हाळ्यात कूलर हे खुप महत्त्वाची भूमिका बजावते. कारण सुर्य एवढी आग ओकत असतो की, घरात कुलर लावणं हे गरजेचं असतं. पण कूलर वापरताना काही संकेतांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
advertisement
1/6

सर्व्हिसिंग गरजेची : उन्हाळ्यात एसीसोबतच कूलरचीही सर्व्हिसिंग करणे गरजेचे असते. तुमचं कुलर जुनं असेल तर हे महत्त्वाचं ठरतं. कारण जुनं कूलर काही संकेत देतं. जे पाहिल्यास, लगेच सर्व्हिसिंग करणं खुप गरजेचं ठरतं. चला संकेत कोणते हे जाणून घेऊया.
advertisement
2/6
कूलिंग कमी झाल्यास : कूलरच्या हवेत गारवा कमी जाणवत असेल तर हे सर्व्हिसिंगचं महत्त्वाचं संकेत आहे. कूलर पहिल्याप्रमाणे हवा देत नसेल तर समजून घ्या की, याचे कूलिंग पॅड काम करत नाहीयेत.
advertisement
3/6
मोटरची बोरिंग खराब झाल्याने किंवा पंख्याचं अलाइनमेंट बिघडल्यामुळे कूलर उन्हाळ्यात गार हवा देत नाही. अशा परिस्थितीत कूलरची लगेच सर्व्हिसिंग करायला हवी.
advertisement
4/6
लिकेजची समस्या : कूलरच्या एखाद्या भागात लिकेज होत असेल तर हा गंभीर समस्येचा संकेत आहे. लिकेजच्या स्थितीमुळे पाइपमध्ये छिद्र किंवा लीकेज टँकमध्ये क्रॅक असू शकतो. अशावेळी लगेच सर्व्हिसिंग करुन घ्या.
advertisement
5/6
कूलरमधील ओलसरपणा : कूलर चालू केल्यावर त्यातून दुर्गंध येत असेल, तर तो ओलसर असू शकतो. कूलिंग पॅडवर बुरशी वाढल्यामुळे असे होते. अशा परिस्थितीत, त्याची ताबडतोब दुरुस्ती करून घ्या.
advertisement
6/6
अतिउष्णता आणि वायरिंग : कूलर चालू असताना वारंवार बंद पडत असेल, तर याचे कारण अतिउष्णता किंवा वायरिंग असू शकते. अशा परिस्थितीत, ते ताबडतोब मेकॅनिककडून तपासून घ्या. अन्यथा शॉर्ट सर्किटचा धोका वाढू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
कूलरमध्ये 'हे' संकेत दिसल्यास लगेच करा दुरुस्त, अन्यथा होऊ शकतं शॉर्ट सर्किट