TRENDING:

Gold Investment Tips: अस्सल शुद्ध सोनं तेही 1000 रुपयांपासून कसं शक्य? 5 पर्याय सर्वात बेस्ट

Last Updated:
धनत्रयोदशीला सोनं विक्रमी दरावर असून मनी कंट्रोलने डिजिटल गोल्ड, ETF, गोल्ड म्युच्युअल फंड्स, सॉवरेन गोल्ड बॉन्ड्स, गोल्ड कॉईन हे स्वस्त गुंतवणुकीचे पर्याय सांगितले.
advertisement
1/7
अस्सल शुद्ध सोनं तेही 1000 रुपयांपासून कसं शक्य? 5 पर्याय सर्वात बेस्ट
सोन्याचे दर</a> विक्रमी उच्चांकावर असल्याने अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. एक ग्रॅम सोनं घेणंही परवडणार नाही असं दर पाहून वाटत आहे. पण घाबरु नका, आम्ही तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहोत की तुम्ही अगदी स्वस्तात सोनं खरेदी करू शकता. " width="1200" height="900" /> आज देशभरात धनत्रयोदशीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते आणि घरी सुख-समृद्धी येते, अशी मान्यता आहे. मात्र, यंदा सोन्याचे दर विक्रमी उच्चांकावर असल्याने अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. एक ग्रॅम सोनं घेणंही परवडणार नाही असं दर पाहून वाटत आहे. पण घाबरु नका, आम्ही तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहोत की तुम्ही अगदी स्वस्तात सोनं खरेदी करू शकता.
advertisement
2/7
ज्यांना प्रत्यक्ष सोने खरेदी करणे शक्य नाही, किंवा ज्यांना उच्च किमतीमुळे कमी प्रमाणात गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे ५ स्मार्ट आणि सोपे मार्ग सांगितले आहेत. या पद्धती वापरून तुम्ही सोन्यात गुंतवणूक सुरू करू शकता. मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार हार्ड सोनं खरेदी करण्यापेक्षा तुम्ही डिजिटल गोल्ड, शेअर, किंवा ETF सारखे पर्याय निवडू शकता. तिथे तुम्हाला कमी पैशांमध्ये सोनं खरेदी करता येईल.
advertisement
3/7
गोल्ड ईटीएफ - गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याचा हा सर्वात सोपा आणि पारदर्शक मार्ग आहे. गोल्ड ईटीएफ हे एक असे आर्थिक साधन आहे, जे थेट सोन्याच्या किमतीचा मागोवा घेते. याचा अर्थ सोन्याचे दर वाढले की ईटीएफची एनएव्ही वाढते आणि दर कमी झाले की एनएव्ही कमी होते. यात गुंतवणूक केल्यास तुम्हाला प्रत्यक्ष सोने सुरक्षित ठेवण्याची चिंता करावी लागत नाही. मात्र, यात गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट अकाउंट असणे आवश्यक आहे.
advertisement
4/7
गोल्ड म्युच्युअल फंड्स - या फंड स्कीम गुंतवणूकदारांचे पैसे गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवतात. ज्यांना डीमॅट खाते उघडायचे नसेल, त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. गरज पडल्यास तुम्ही यातला पैसा सहज काढू शकता. याचे रिटर्न सोन्याच्या दराच्या वाढीवर अवलंबून असतात. अनेक मोठ्या म्युच्युअल फंड कंपन्यांच्या गोल्ड स्कीम बाजारात उपलब्ध आहेत.
advertisement
5/7
सॉवरेन गोल्ड बॉन्ड्स - नोव्हेंबर २०१५ मध्ये सरकारने भौतिक सोन्याला पर्याय देण्यासाठी ही योजना सुरू केली. आरबीआय हे बॉन्ड्स भारत सरकारच्या वतीने जारी करते. यात केलेली गुंतवणूक ८ वर्षांत मॅच्युअर होते. सोन्यातील तेजीचा फायदा तर मिळतोच, पण यासोबतच सरकारकडून गुंतवणूकदारांना वार्षिक २.५ टक्के व्याजही मिळते. जरी सरकारने सध्या नवीन बॉन्ड्सची किस्त जारी केली नसली तरी, तुम्ही हे बॉन्ड्स स्टॉक एक्सचेंजमधून खरेदी करू शकता.
advertisement
6/7
गोल्ड कॉईन- हा सर्वात पारंपारिक आणि थेट मार्ग आहे. धनतेरसच्या निमित्ताने ई-कॉमर्स कंपन्या ८ ते १० ग्रॅमचे गोल्ड कॉईन विकत आहेत. हे कॉईन ब्रँडेड कंपन्यांचे असल्याने त्यांच्या शुद्धतेबद्दल कोणतीही चिंता नसते. अनेक कंपन्या या नाण्यांवर सूट देखील देत आहेत.
advertisement
7/7
डिजिटल गोल्ड - हा सोन्यात गुंतवणूक करण्याचा आधुनिक मार्ग आहे. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसने धनतेरस आणि दिवाळीसाठी डिजिटल गोल्डची ऑफर आणली आहे. ग्राहक त्यांच्या मोबाईल ॲपद्वारे याची खरेदी करू शकतात. कंपनी २००० रुपये किंवा त्याहून अधिक किमतीचे डिजिटल गोल्ड खरेदी करणाऱ्यांना अतिरिक्त २ टक्के सोने मोफत देत आहे. डिजिटल गोल्ड खरेदी करण्याचा हा पर्याय १८ ते २३ ऑक्टोबरपर्यंत खुला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Gold Investment Tips: अस्सल शुद्ध सोनं तेही 1000 रुपयांपासून कसं शक्य? 5 पर्याय सर्वात बेस्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल