TRENDING:

Petrol Price : भारतात 200 रुपये लिटर होणार पेट्रोल? इराणमधील तणावामुळे तेल पुरवठा धोक्यात, सामान्यांच्या खिशाला फटका

Last Updated:
petrol price will cross 200 rupees : इराणची राजधानी तेहरानसह 30 पेक्षा जास्त ठिकाणांना इस्त्राईल लक्ष्य केले आहे. राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान, सरकारी कार्यालये, विमानतळ आणि इंटेलिजन्स विभागाच्या इमारतींवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव झाला आहे. इराणमध्ये सध्या 'ब्लॅकआउट' आहे आणि शाळा-कॉलेज बंद करण्यात आली आहेत.
advertisement
1/11
भारतात 200रुपये लिटर होणार पेट्रोल? इराणमधील तणावामुळे सामान्यांच्या खिशाला फटका
जगाच्या पाठीवर जेव्हा कुठेही युद्धाला सुरावात होते तेव्हा त्याचे पडसाद केवळ रणांगणापुरते मर्यादित राहत नाहीत. तर इतरही देशांवर त्याचे परिणाम होतात. सध्या मध्यपूर्वेत (Middle East) पेटलेला वणवा याचेच जिवंत उदाहरण आहे. इस्त्राईल आणि इराणमध्ये झालेल्या लढाईने आजूबाजूचे देश आणि संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे.
advertisement
2/11
इराणची राजधानी तेहरानसह 30 पेक्षा जास्त ठिकाणांना इस्त्राईल लक्ष्य केले आहे. राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान, सरकारी कार्यालये, विमानतळ आणि इंटेलिजन्स विभागाच्या इमारतींवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव झाला आहे. इराणमध्ये सध्या 'ब्लॅकआउट' आहे आणि शाळा-कॉलेज बंद करण्यात आली आहेत.
advertisement
3/11
हे युद्ध भारतापासून 2139 किलोमीटर दूर असले, तरी याची धग लवकरच भारतीयांच्या घरापर्यंत पोहोचणार आहे. या महायुद्धामुळे भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढून महागाईचा भडका उडण्याची भीती निर्माण झाली आहे.
advertisement
4/11
इराण हा जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक देशांपैकी एक आहे. इराणकडे तब्बल 158 बिलियन बॅरल कच्च्या तेलाचा साठा आहे. जरी अमेरिकेच्या निर्बंधांमुळे इराण पूर्ण क्षमतेने निर्यात करू शकत नसला, तरी चीन आणि भारतासारख्या देशांसाठी इराण हा महत्त्वाचा स्रोत आहे.
advertisement
5/11
चीन दररोज 18 लाख बॅरल तेल इराणकडून घेतो. भारताचा विचार केला तर आपल्या एकूण गरजेपैकी 40 टक्के कच्चे तेल आणि 50 टक्के एलएनजी (LNG) खाडी देशांमधून (इराण, सौदी अरब, युएई) येते. पण आता या युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत होण्याचे संकेत मिळत आहेत.
advertisement
6/11
भारतासाठी सर्वात चिंतेची बाब म्हणजे 'होर्मुज जलडमरूमध्य' (Strait of Hormuz). हा एक अत्यंत अरुंद सागरी मार्ग आहे, ज्याला जागतिक तेलाची 'लाईफलाईन' म्हटले जाते. जगातील 20 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक याच मार्गातून होते. भारताच्या एकूण तेल आयातीपैकी 50 टक्के तेल याच मार्गाने येते. सौदी, इराक, कुवेत आणि कतारचे तेल देखील याच मार्गाने भारतात पोहोचते.
advertisement
7/11
जर युद्धाच्या भरात इराणने हा मार्ग बंद केला (जसा 1980 मध्ये केला होता), तर भारतासह चीन आणि जपानला तेलाच्या महासंकटाचा सामना करावा लागेल. मालवाहतूक आणि विम्याचा खर्च वाढल्याने कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होईल.
advertisement
8/11
पेट्रोल 200 रुपये पार होणार का?तज्ज्ञांच्या मते, जर युद्धाची तीव्रता अशीच राहिली आणि तेल पुरवठा खंडित झाला, तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती 95 ते 110 डॉलर प्रति बॅरल पर्यंत जाऊ शकतात. सध्या ब्रेंट क्रूड 73 डॉलरच्या आसपास असले तरी ते सात महिन्यांच्या उच्चांकावर आहे.
advertisement
9/11
भारतातील तेल कंपन्या कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा भार जास्त काळ सोसू शकणार नाहीत. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ अटळ आहे. जर जागतिक परिस्थिती हाताबाहेर गेली, तर पेट्रोलचे दर ऐतिहासिक उच्चांक गाठून सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लावतील. असा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतू आतातरी याबद्दलची अशी कोणतीही माहिती भारत सरकारकडून देण्यात आलेली नाही.
advertisement
10/11
केवळ तेलच नाही, तर सोने आणि शेअर बाजारही कोसळणार!या युद्धाचा परिणाम केवळ पेट्रोल पंपावरच नाही, तर तुमच्या गुंतवणुकीवरही होईल1. युद्धाच्या वृत्तामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. यामुळे विदेशी गुंतवणूकदार पैसा काढून घेतात आणि शेअर बाजार कोसळण्याची (Market Crash) शक्यता असते.2. जेव्हा जगभरात अस्थिरता असते, तेव्हा गुंतवणूकदार सोन्याला सुरक्षित मानतात. मागणी वाढल्याने सोन्याचे भाव गगनाला भिडू शकतात. म्हणजेच, दागिने खरेदी करणे आता अधिक महाग होईल.3. दैनंदिन महागाई: पेट्रोल-डिझेल महाग झाले की वाहतूक खर्च वाढतो. यामुळे भाजीपाला, दूध, धान्य आणि औषधे यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ होऊन 'महागाईचा महापूर' येऊ शकतो.
advertisement
11/11
भारतासमोर मोठे आव्हानपेंट, केमिकल्स, पेट्रोकेमिकल्स आणि सिंथेटिक कपडे बनवणाऱ्या उद्योगांवरही याचे थेट परिणाम होतील. इराण आणि इस्रायलमधील हा संघर्ष लवकर शांत न झाल्यास भारताची अर्थव्यवस्था दबावाखाली येईल. पंतप्रधान मोदी आणि भारतीय मुत्सद्दी या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत, कारण हे युद्ध केवळ दोन देशांमधील नाही, तर भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या खिशाशी जोडलेले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Petrol Price : भारतात 200 रुपये लिटर होणार पेट्रोल? इराणमधील तणावामुळे तेल पुरवठा धोक्यात, सामान्यांच्या खिशाला फटका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल