Aadhaar Card हरवलं तर ते परत कसं मिळवायचं? जाणून घ्या सोपी प्रोसेस
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
तुमचे आधार कार्ड हरवले किंवा फाटले तर तुम्ही डुप्लिकेट आधार कार्डसाठी अर्ज करू शकता. तुम्हाला याची काळजी करण्याची गरज नाही. परंतु आधार कार्ड हरवल्यास किंवा खराब झाल्यास डुप्लिकेट कसे करायचे पाहूया.
advertisement
1/8

तुमचे आधार कार्ड हरवले तर? फाटले असेल तर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला डुप्लिकेट आधार कार्ड मिळू शकते. आधार कार्ड युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI वेबसाइटवरून ऑनलाइन मिळवता येते. तसचं, तुमचे आधार कार्ड हरवले असेल, तर सर्वप्रथम तुम्ही आधार कार्ड हरवल्याची तक्रार दाखल करावी.
advertisement
2/8
आधार कार्ड हरवल्याची तक्रार कुठे करावी : तुम्ही UIDAI टोल-फ्री क्रमांक 1947 वर कॉल करून आधार कार्ड हरवल्याची तक्रार करू शकता. तुम्ही help@uidai.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून ईमेल करून देखील तक्रार दाखल करू शकता. तुम्ही तक्रार दाखल केली नाही, तर तुमच्या आधार कार्डचा गैरवापर झाल्यास त्याची जबाबदारी तुमची असेल.
advertisement
3/8
डुप्लिकेट आधारसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा : सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत UIDAI वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यानंतर, UIDAI वेबसाइटवर आधार सर्व्हिस सेक्शन दिसेल. हे मेनू बार किंवा ड्रॉप-डाउन मेनूमध्ये दिसेल.
advertisement
4/8
त्यानंतर तुम्हाला “Retrieve Lost UID/EID” हा ऑप्शन दिसेल. हे तुम्हाला एका नवीन पेजवर घेऊन जाईल जिथून तुम्ही डुप्लिकेट आधार कार्डसाठी रिक्वेस्ट करू शकता.यानंतर, “Retrieve Lost UID/EID” ऑप्शनवर क्लिक करा आणि आधार नंबर किंवा इनरोल नंबर टाका.
advertisement
5/8
त्यानंतर तुम्हाला पूर्ण नाव, रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि ईमेल यासारखी आवश्यक माहिती प्रविष्ट करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला एक सिक्योरिटी कोड दिसेल. यानंतर, रजिस्टर्ड अॅड्रेस आणि जन्मतारीख यासारखी अतिरिक्त माहिती भरावी लागेल.
advertisement
6/8
डिटेल्स भरल्यानंतर, सेंड ओटीपी ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला वन-टाइम पासवर्ड ऑप्शनवर टॅप करावे लागेल. यानंतर तुम्हाला OTT मध्ये प्रवेश करून ते व्हेरिफाय करावे लागेल.
advertisement
7/8
एकदा तुम्ही OTP टाकल्यानंतर, कॅप्चा कोड टाका आणि नंतर सबमिट बटणावर क्लिक करा. ओटीपी व्हेरिफिकेशननंतर, तुमचा आधार नंबर तुमच्या मोबाईल नंबरवर दिसेल. यानंतर, ते सेलेक्ट करुन कंफर्म करावे लागेल.
advertisement
8/8
नोट - आधार कार्ड नंबर आणि इनरोलमेंट आयडीच्या मदतीने तुम्ही UIDAI पोर्टलवरून डुप्लिकेट आधार कार्ड मिळवू शकाल.