EPFO चं नवं अॅप लवकरच येणार! आता काही मिनिटांत काढता येतील पीएफचे पैसे
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
EPFO मधून पैसे काढण्याची सध्या मोठी प्रोसेस आहे. मात्र आता हे काम अगदी सोपं होणार आहे. कारण ईपीएफओचं एक अॅप येईल. या माध्यमातून तुम्ही सहज पैसे काढू शकता.
advertisement
1/7

भारतातील कोट्यवधी कर्मचारी ईपीएफओशी जोडले गेले आहेत. आता या सर्व नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) आपल्या कोट्यवधी सब्सक्रायबर्ससाठी मोठा बदल घेऊन येणार आहे. लवकरच एक नवीन मोबाईल अॅप लॉन्च होणार आहे. ज्यामुळे पीएफचे पैसे काढणे पहिल्यापेक्षा जास्त सोपं होईल. विशेष म्हणजे या नवीन अॅपमध्ये यूपीआयच्या माध्यमातून थेट बँक अकाउंटमध्ये पैसा ट्रान्सफर केला जाऊ शकेल.यामुळे दीर्घ प्रक्रिया आणि प्रतिक्षा संपण्याची आशा आहे. सध्या या फीचरची टेस्टिंग पूर्ण झाली आहे आणि लवकरत ते रोलआउट केलं जाऊ शकतं.
advertisement
2/7
EPFO चं नवं मोबाईल अॅप यूझर्ससाठी पीएफचे पैसे काढणे पूर्णपणे डिजिटल आणि सोपे बनवण्यावर फोक करेल. हे अॅप थेट यूझरच्या बँक अकाउंटशी जोडले जाईल आणि हे BHIM सह इतर यूपीआय अॅप्ससह इंटीग्रेट होईल.
advertisement
3/7
यामुळे यूझर्स पहिले आपल्या EPF अकाउंटमधून पैसा बँकेत ट्रान्सफर करू शकतील. नंतर यूपीआयच्या माध्यमातून सहज काढू शकतील. सध्या PF चे पैसे काढण्यासाठी फक्त ऑनलाइन पोर्टलचा ऑप्शन उपलब्ध आहे. ज्यात खुप वेळ लागतो आणि प्रोसेसही मोठी आहे. नवीन सिस्टम आल्याने हे काम काही मिनिटांत पूर्ण होऊ शकतील. ज्यामुळे कोट्यवधी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.
advertisement
4/7
75% पर्यंत पैसे काढू शकतील : नवीन फीचरअंतर्गत EPFO सब्सक्राइबर्स आपल्या पीएफ बॅलेन्सच्या जास्तीत जास्त 75 टक्के भाग काढू शकतील. खरंत नियमानुसार किमान 25 टक्के रक्कम अकाउंटमध्ये ठेवणे गरजेचे असेल. याचा अर्थ पूर्ण पैसा एकदा काढणे शक्य नाही.
advertisement
5/7
एखाद्याची नोकरी गेली तर उर्वरित 25 टक्के पैसे तुम्ही 12 महिन्यानंतर काढू शकता. अधिकाऱ्यांनुसार हा नियम फंड सुरक्षित टिकवून ठेवण्यासाठी लागू करण्यात आलाय. सध्या ईपीएफओजवळ जवळपास 26 लाख कोटी रुपयांचा फंड आहे. कोट्यवधी लोकांचा फंड यात आहे. यामुळेच असे नियम महत्त्वाचे मानले जातात.
advertisement
6/7
UMANG वरुन अजुनही करू शकता क्लेम : नवीन ईपीएफओ अॅप पूर्णपणे लॉन्च होत नाही. तोपर्यंत यूझर्स UMANG अॅपच्या माध्यमातून पीएफ काढू शकतात. या अॅपमध्ये यूपीआयचा ऑप्शन सध्या उपलब्ध नाही. मात्र पारंपारिक पद्धतीने क्लेम फाइल करणं सोपं आहे.
advertisement
7/7
यूझर्सला ईपीएफओ पोर्टलवर रजिस्ट्रेशन आणि UMANG अॅपची गरज असते. ज्यानंतर ते मोबाईलनेच अर्ज करू शकतात. यामध्ये कंप्यूटरवर लॉगइन करण्याची गरज पडत नाही आणि प्रोसेस मोबाईल फ्रेंडली होते. अशावेळी नवीन अॅप येईपर्यंत हा ऑप्शन यूझर्ससाठी खुप फायदेशीर ठरू शकतो.