TRENDING:

30,000 पगार तरी 60 लाखाचं घर घेता येईल का? सोप्या भाषेत समजून घ्या कॅलक्युलेशन

Last Updated:
६० लाख रुपयांचे घर घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न किमान २० लाख, ४० टक्के डाउन पेमेंट, २० वर्षांचा लोन कालावधी आणि ईएमआय सॅलरीच्या ३० टक्क्यांपेक्षा कमी असावी.
advertisement
1/7
30,000 पगार तरी 60 लाखाचं घर घेता येईल का? सोप्या भाषेत समजून घ्या कॅलक्युलेशन
प्रत्येक दाम्पत्याचं किंवा तरुण-तरुणीचं स्वप्न असतं की आपलं स्वत:चं असं एक अलिशान घर असावं. काहीवेळा अलिशान घेता येत नाही मात्र घर असण्याचं स्वप्न मात्र पूर्ण करायचं असेल तर तुमचा पगार किती हवा? त्यासाठी लोन किती लागेल हे माहिती असायला हवं. घर घेणं ही खूप मोठी जबाबदारी आहे.
advertisement
2/7
होम लोनमुळे आज घर खरेदी करण्याचं स्वप्न साकार करणं तुलनेने सोपं झालं आहे. मात्र बँक जितकं लोन देते तितकाच घ्यावं, हा समज अनेकांना पुढे जाऊन ईएमआयच्या ओझ्याखाली जगायला भाग पडतो. त्यामुळे घर खरेदीचा निर्णय घेताना पगार आणि आर्थिक नियोजन यांचा समतोल राखणे खूप गरजेचं आहे.
advertisement
3/7
जर तुम्हाला ६० लाख रुपयांचे घर घ्यायचं असेल, तर तुमचा पगार किती असावा, डाउन पेमेंट किती असावं आणि ईएमआय किती असावा, यासाठी आर्थिक तज्ज्ञ 3/20/30/40 हा फॉर्म्युला वापरण्याचा सल्ला देतात. हा फॉर्म्युला तुमची आर्थिक तब्येत बिघडू न देता घर खरेदी करण्यासाठी मार्गदर्शक ठरतो.
advertisement
4/7
घराची एकूण किंमत तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या तीनपटांपेक्षा जास्त नसावी. म्हणजेच जर घराची किंमत साठ लाख रुपये असेल, तर तुमचे वार्षिक उत्पन्न किमान वीस लाख रुपये असणे अपेक्षित आहे. होम लोनचा कालावधी जास्तीत जास्त वीस वर्षांचा असावा. कमी कालावधीचा लोन घेतल्यास ईएमआय वाढते, तर तीस वर्षांसारखा दीर्घकालीन लोन घेतल्यास व्याजाचा बोजा प्रचंड वाढतो.
advertisement
5/7
तुमच्या होम लोनची ईएमआय तुमच्या महिन्याच्या इन हँड सॅलरीच्या तीस टक्क्यांपेक्षा जास्त नसावी. यामुळे घरखर्च, बचत आणि आकस्मिक गरजांसाठी पुरेसा पैसा हातात राहतो. घराच्या किमतीपैकी किमान चाळीस टक्के रक्कम डाउन पेमेंट म्हणून स्वतःकडून भरावी. जास्त डाउन पेमेंट करता येत असेल, तर ते आर्थिकदृष्ट्या अधिक सुरक्षित ठरते.
advertisement
6/7
या फॉर्म्युल्यानुसार साठ लाख रुपयांचे घर घ्यायचे असेल, तर तुमचे वार्षिक उत्पन्न किमान वीस लाख रुपये असावे. म्हणजेच महिन्याची इन हँड सॅलरी साधारण एक लाख साठ सहा हजार रुपये होते. चाळीस टक्के डाउन पेमेंटनुसार तुम्हाला चोवीस लाख रुपये स्वतःकडून भरावे लागतील. त्यामुळे बँकेकडून फक्त छत्तीस लाख रुपयांचा होम लोन घ्यावा लागेल.
advertisement
7/7
समजा तुम्ही छत्तीस लाख रुपयांचा होम लोन वीस वर्षांसाठी घेतला आणि व्याजदर साडेआठ टक्के असेल, तर तुमची मासिक ईएमआय सुमारे एकतीस हजार दोनशे रुपयांच्या आसपास बसेल. ही ईएमआय तुमच्या इन हँड सॅलरीच्या तीस टक्क्यांपेक्षा खूपच कमी आहे. त्यामुळे ती सहज परवडणारी ठरते आणि भविष्यात व्याजदर वाढले तरी फारसा आर्थिक ताण येणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
30,000 पगार तरी 60 लाखाचं घर घेता येईल का? सोप्या भाषेत समजून घ्या कॅलक्युलेशन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल