TRENDING:

Success Story : पिकअप गाडीत नाश्ता सेंटर, 1200 वडापावची होते विक्री, तरुणाचा महिन्याला इतका थेट नफा

Last Updated:
गणेश तागडे या तरुणाने देखील स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आपल्या व्यवसायातून तो महिन्याला लाखो रुपये नफा मिळवत आहे.
advertisement
1/7
पिकअप गाडीत नाश्ता सेंटर, 1200 वडापावची होते विक्री, तरुणाचा महिन्याला इतका थेट नफा
आजकाल अनेक जण व्यवसाय करण्याला प्राधान्य देत आहेत. नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय असावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. छत्रपती संभाजीनगरमधील पैठण रोडवरील गेवराई येथील गणेश तागडे या तरुणाने देखील स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आपल्या व्यवसायातून तो महिन्याला लाखो रुपये नफा मिळवत आहे.
advertisement
2/7
मागील 4 वर्षांपासून गणेश तागडे हा नाश्ता सेंटर चालवत आहे. विघ्नहर्ता आप्पा वडेवाले असं त्याच्या नाश्ता सेंटरचं नाव आहे. त्याच्याकडे वडापाव, मिसळपाव, भजी यासह विविध प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात. पैठण, चितेगाव यासह विविध भागातून खवय्ये त्याच्याकडे नाश्त्यासाठी येतात.
advertisement
3/7
गणेशचे वडील शाम तागडे एक वडापावची गाडी चालवत होते. गणेशची पाणी बॉक्स विक्रीची एजन्सी होती. मात्र, कोरोना काळात बाप-लेकाचा दोघांचा रोजगार गेला. कोरोनानंतर गणेशने पैठण रोडवरील गेवराई येथे नाश्ता सेंटर सुरू केले. त्यांनी छोट्या पिक अप गाडीत नाश्ता सेंटर सुरू केले आहे. यामध्ये पाण्याच्या टाकीसाठी स्वतंत्र जागा, तसेच खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी वेगळी जागा, सर्व पदार्थ बनवण्यासाठी वेगळी जागा अशी सोय केली आहे. रात्रीच्या वेळी लाइटची आवश्यकता असते त्यामुळे इन्व्हर्टर बसवण्यात आलेले आहे.
advertisement
4/7
ही गाडी बनवण्यासाठी त्यांना अडीच ते 3 लाख रुपये खर्च आला आहे. गणेशचा संपूर्ण व्यवसाय फक्त एका पिकअप गाडीत असला तरी कमालीची स्वच्छता बाळगली जाते. तसेच त्याच्याकडील खाद्यपदार्थांची चव देखील ग्राहकांना आवडत असल्याने लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.
advertisement
5/7
गणेशच्या मते, नवीन क्षेत्रात येण्याअगोदर त्याचे ज्ञान मिळवणे महत्त्वाचे आहे. नाश्ता सेंटर छोटे जरी असलं तरी त्यामध्ये पदार्थ कोणते ठेवायचे, त्यांची चव कशी असली पाहिजे, ग्राहकांना काय आवडते, अशा बारीक गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी गरज असते.
advertisement
6/7
गणेश नाश्ता सेंटरवर दररोज 1 हजार ते 1200 वडापावची विक्री करतो. या नाश्ता सेंटरच्या माध्यमातून दररोज 30 हजार रुपयांपर्यंत उलाढाल होत असते. नाश्ता सेंटरच्या व्यवसायातून खर्च वजा करून गणेशला दीड ते 2 लाख रुपयांपर्यंत नफा मिळतो.
advertisement
7/7
मिसळसाठी लागणाऱ्या मसाल्यांपैकी फक्त हळद ही बाहेरची वापरली जाते. बाकीचे सर्व मसाले घरगुती असतात. तसेच चांगल्या दर्जाचे बेसन पीठ, तेल वापरले जाते, जेणेकरून सर्व पदार्थ कमी तेलकट असतात. असे पदार्थ ग्राहकांनाही आवडतात, त्यामुळे या ठिकाणी कायम गर्दी असते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Success Story : पिकअप गाडीत नाश्ता सेंटर, 1200 वडापावची होते विक्री, तरुणाचा महिन्याला इतका थेट नफा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल