Gold Silver Prices: आज काय आहे सोन्या-चांदीचा भाव, किंमती वाढल्या की घसरल्या? पाहाच
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Gold and Silver Rate : 11 फेब्रुवारीला एमसीएक्सवरील तेजीनंतर 12 फेब्रुवारीच्या सकाळी सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली आहे. चला पाहूया आज किती रुपयांनी सोनं आणि चांदीच स्वस्त झाले आहेत.
advertisement
1/9

Gold Prices Today: सोन्याच्या भावामध्ये 11 फेब्रुवारी रोजी एमसीएक्सवर तेजी पाहायला मिळाली होती. आज 12 फेब्रुवारीला MCX वर सोन्याचा भाव घसरला आहे. सोन्याच्या रेटमध्ये आज 9 वाजता MCX वर 715 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे.
advertisement
2/9
आज सोन्याचा भाव 158040 रुपये प्रति 10 ग्रामवर आला आहे. म्हणजेच 0.48 टक्के घसरण आली आहे. तसंच चांदीचा भावही कमी झाला आहे. सिल्व्हर प्राइज 0.48 टक्के म्हणजेच 1268 रुपयांनी खाली येऊन 261750 रुपये प्रति किलोग्राम झाली आहे.
advertisement
3/9
यासोबतच इंटरनॅशनल मार्केटमध्येही सोने आणि चांदीच्या भावात घसरण नोंदवण्यात आली आहे. कॉमेक्सवर गोल्ड रेट 0.25 टक्क्यांनी खाली येऊन 5085.30 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे आणि चांदी 0.14 टक्के कोसळून 83.805 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत आहे.
advertisement
4/9
कोणत्या कारणामुळे कोसळला सोन्य-चांदीचा भाव? : 12 फेब्रुवारीला सोने आणि चांदीच्या किंमतीत थोडी घसरण येण्यामागे काही महत्त्वाची कारणं आहेत. अमेरिकेच्या मजबूत रोजगार आकड्यांनंतर फेडरल रिझर्व्ह लवकर व्याजदार कपात करेल, ज्याचा परिणाम धातूंच्या किंमतीवर पडला ही आशा खुप कमी झाली आहे.
advertisement
5/9
अमेरिकन डॉलर इंडेक्स सलग दुसऱ्या दिवशी मजबूत झाला. जानेवारीच्या एम्प्लॉयमेंट रिपोर्ट अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी आल्यानंतर डॉलरची किंमत आणखी वाढली. सामान्यतः, जेव्हा डॉलर मजबूत होतो तेव्हा सोने आणि चांदीसारख्या मौल्यवान धातूंवर दबाव येतो, ज्यामुळे इतर चलने धारण करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ते अधिक महाग होतात.
advertisement
6/9
जानेवारीमध्ये, अमेरिकेत नोकऱ्यांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त वाढली आणि बेरोजगारीचा दर 4.3% पर्यंत घसरला. हे स्पष्टपणे दर्शवते की कामगार बाजार मजबूत आहे. या आकडेवारीनंतर, बाजार असा विश्वास करू लागला आहे की फेडरल रिझर्व्ह लवकरच व्याजदर कमी करणार नाही आणि काही काळासाठी ते बदलणे थांबवू शकते.
advertisement
7/9
सोन्यात आणखी घसरण होणार? : मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, VT मार्केट्सच्या ग्लोबल स्ट्रॅटेजी ऑपरेशन्स लीड रॉस मॅक्सवेलनुसार, सोन्याचा दर 6,000 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचण्यासाठी संकट आल्याची परिस्थिती असावी लागेल. त्याच्यानुसार, सध्याच्या मजबूत तेजीनंतर इथपर्यंत पोहोचण्यासाठी किंमतींमध्ये जवळपास 20% आणखी उसळी हवी आहे. यासाठी डॉलरमध्ये मोठी कमजोरी, व्याजदार वेगाने कपात, केंद्रीय बँकांची सतत खरेदी, महागाईची नवी भिती आणि एखाजा मोठा जियोपॉलिटिकल किंवा आर्थिक झटक्यासारख्या अनेक कारणं असणे गरजेचे असेल.
advertisement
8/9
त्यांनी असेही म्हटले की, डॉलरचे मूल्य कमी करणे, सतत वाढत जाणारी महागाई आणि देशांनी त्यांच्या साठ्यात विविधता आणणे यासारखे दीर्घकालीन ट्रेंड सोन्याला आधार देऊ शकतात, परंतु जगात मोठे बदल न होता, नजीकच्या भविष्यात प्रति औंस $6,000 पर्यंत पोहोचणे कठीण दिसते.
advertisement
9/9
वेगवेगळ्या शहरांमध्ये सोन्याचे दर : शहरांच्या बाबतीत, दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, जयपूर, भोपाळ, लखनौ आणि चंदीगडमध्ये किंमत 2,89,900 रुपये रुपये नोंदवली गेली. चांदीचा भाव 4.20 लाख रुपये या त्याच्या सर्वकालीन उच्चांकावरून ₹1.60 लाखांपेक्षा जास्त घसरला आहे. सोन्याचा भाव देखील ₹1.94 लाख या विक्रमी उच्चांकावरून ₹37,000 पेक्षा जास्त घसरला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Gold Silver Prices: आज काय आहे सोन्या-चांदीचा भाव, किंमती वाढल्या की घसरल्या? पाहाच