Gold Price Today: व्हॅलेंटाइन डेला सोन्यामध्ये तेजी! चांदीचा रंग पडला फिका, चेक करा रेट
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Gold Price Today: अमेरिका-ईराण तणाव आणि रशिया-युक्रेन संघर्साविषयी भू-राजनैतिक तणावात थोडी कमतरता आल्यानेही सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीची मागणी कमी झाली आहे. बेंगळुरुमध्ये 22 कॅरेट गोल्डची किंमत 142790 रुपये प्रति 10 ग्राम आहे.
advertisement
1/7

Gold Rate Today: 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाइन डेला सोन्याच्या भावात तेजी आली आहे. आज सकाळी राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट गोल्डचा रेट वाढून 157900 रुपये प्रति 10 ग्राम झाला आहे.
advertisement
2/7
मुंबईत किंमत 157750 रुपये प्रति 10 ग्रामवर आहेत. एक दिवसआधी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याची किंमत 2,400 रुपये किंवा 1.5 टक्के कमी होऊन 1,58,500 रुपये प्रति 10 ग्राम राहिली होती.
advertisement
3/7
जागतिक बाजाराविषयी बोलायचं झाल्यास स्पॉट गोल्ड 4,968.40 डॉलर प्रति औसवर आहे. जेपी मॉर्गनचा अंदाज आहे की 2026 च्या अखेरीस सोन्याचे भाव प्रति औंस 6,300 डॉलरपर्यंत पोहोचतील.
advertisement
4/7
दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची किंमत 157900 रुपये प्रति 10 ग्राम आहे. 22 कॅरेटचा भाव 144750 रुपये प्रति 10 ग्राम आहे.
advertisement
5/7
मुंबई, चेन्नई आणि कोलकाता: सध्या मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 144600 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्राम 155770 रुपये आहे.
advertisement
6/7
पुणे आणि बंगळुरुमध्ये किंमत : या दोन्ही शहरांमध्ये 24 कॅरेट गोल्डची किंमत 155770 रुपये प्रति 10 ग्राम आणि 22 कॅरेट गोल्डची किंमत 144600 रुपये प्रति 10 ग्राम आहे.
advertisement
7/7
चांदीची किंमत : चांदीमध्ये 14 फेब्रुवारीला सकाळी घसरण झाली आहे. किंमत 275000 रुपये प्रति किलोग्रामवर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा हाजिर भाव 77.30 डॉलर प्रति औंसवर आहे. एक दिवसपूर्वी दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीची किंमत 13,500 रुपये किंवा 5.03 टक्क्यांनी कमी होऊन 2,55,000 रुपये प्रति किलोग्राम राहिली. जानेवारी महिन्यात चांदीची किंमत 4 लाख रुपयांच्या आकड्याला क्रॉस करत होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Gold Price Today: व्हॅलेंटाइन डेला सोन्यामध्ये तेजी! चांदीचा रंग पडला फिका, चेक करा रेट