Gold Rate Today: सराफा बाजाराचे सगळे अंदाज फोल, सोन्याची उच्चांकी उसळी, एका दिवसात पहिल्यांदाच इतकं महागलं!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण होणार असल्याचा अंदाज अमेरिकन संस्थांनी वर्तवला होता. परंतु, आज सोन्याच्या दरांनी पुन्हा विक्रमी उसळी घेतलीये.
advertisement
1/5

गेल्या आठवड्याच्या अखेरच्या काही दिवसात सोने दरात घसरण झाली होती. उच्चांकीपासून सोन्याचे दर खाली आल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आता सोने दरातील घसरणीला ब्रेक लागला असून आज गुरुवारी सोन्याच्या भावात मोठी दरवाढ झाली आहे.
advertisement
2/5
नाशिक सराफा बाजारात सोन्याच्या भावात विक्रमी वाढ झालीये. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 2,940 रूपये प्रति 10 ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या स्वस्ताईच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईचा चटका बसला आहे. सोन्याच्या दरांत एका दिवसातील ही सर्वात मोठी वाढ ठरलीये.
advertisement
3/5
बुधवारी 24 कॅरेक सोन्याचा भाव हा 90,470 इतका होता. मात्र आज या दरवाढीनंतर नाशिकच्या सराफ बाजारात 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 93,410 रुपये इतका आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 85630 रुपये इतका आहे.
advertisement
4/5
दुसरीकडे चांदी दरातही मोठी वाढ झालीय. आज चांदीचा दर प्रति किलो 2 हजार रुपयांनी वाढून 95,000 रुपयावर पोहोचला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत कमी होत असलेले चांदीचे दर देखील पुन्हा वाढले आहेत.
advertisement
5/5
दरम्यान, अमेरिकेतील मॉर्निंगस्टारच्या विश्लेषकांनुसार पुढील काही वर्षांत सोन्याच्या किमती 38 टक्के कमी होऊ शकतात. अशा परिस्थितीत, भारतात सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 55 हजार रुपयांपर्यंत कमी होण्याचा अंदाज आहे. मात्र, आज सोन्याच्या दरात झालेली मोठी वाढ पाहता आणि जागतिक अस्थिरता लक्षात घेऊन सध्या मौल्यवान धातूच्या किमती 56,000 रुपयांपर्यंत कमी होतील, असा अंदाज लावणं कठीण आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Gold Rate Today: सराफा बाजाराचे सगळे अंदाज फोल, सोन्याची उच्चांकी उसळी, एका दिवसात पहिल्यांदाच इतकं महागलं!