Gold Price : तुमच्याकडे 1 तोळं सोनं असेल तर तुम्ही होणार लखपती, सोन्याच्या दराची मोठी अपडेट
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Mohan Najan
Last Updated:
मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सणासुदीचा हंगाम सुरु झाल्यापासून सोन्याच्या दराने सातत्याने उच्चांक गाठला आहे.
advertisement
1/7

मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. जागतिक बाजारपेठेत सुरू असलेले युद्ध, आर्थिक अनिश्चितता आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशी व्यापाराबाबत घेतलेल्या नव्या धोरणांमुळे सोन्याच्या दरामध्ये मोठी उसळी पाहायला मिळत आहे. सणासुदीचा हंगाम सुरु झाल्यापासून सोन्याच्या दराने सातत्याने उच्चांक गाठला आहे.
advertisement
2/7
सणासुदीचा हंगाम सुरु झाल्यापासून सोन्याच्या दराने सातत्याने उच्चांक गाठला आहे. पुण्यात आज सोन्याची आणखी भाव वाढ झाली आहे .
advertisement
3/7
आज पुणे बाजारपेठेत 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 96 हजार 300 रुपयांवर पोहोचला असून जीएसटी सह हा दर 99 हजार 200 रुपये इतका झाला आहे.ही किंमत आजवरच्या दरांपेक्षा सर्वाधिक असल्याचे सोने व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
advertisement
4/7
केवळ सोन्याच नाही तर चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. आज चांदीचा दर प्रति किलो 98 हजार 900 रुपयांवर पोहोचला आहे.
advertisement
5/7
जागतिक बाजारपेठेत डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, मध्यपूर्वेत सुरू असलेले युद्धजन्य वातावरण आणि गुंतवणूकदारांची सुरक्षित मालमत्ता म्हणून सोन्याकडे वाढता कल यामुळे सोन्याच्या दरात ही झपाट्याने वाढ होत आहे.
advertisement
6/7
सोने व्यापाऱ्यांच्या मते, सध्याच्या घडामोडी आणि गुंतवणूकदारांच्या मानसिकतेचा विचार करता, पुढील काही दिवसांत सोन्याचे दर हे 1 लाख रुपयांचा टप्पा पार करू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.
advertisement
7/7
अनेक गुंतवणूकदार सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोन्यामध्ये गुंतवणूक करत असून, हे सुरक्षित व स्थिर उत्पन्न देणारे माध्यम म्हणून सोने पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Gold Price : तुमच्याकडे 1 तोळं सोनं असेल तर तुम्ही होणार लखपती, सोन्याच्या दराची मोठी अपडेट