Gold Silver Price Today: काही तासांत पुन्हा 19857 रुपयाांनी वाढली चांदी, सोन्याच्या दराचं काय झालं?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
सोन्या-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ, चांदी 4 लाख 20 हजारांवरून 2 लाख 71 हजारांवर आली. विकेण्डला सोनं चांदी महाग, गुंतवणूकदारांचे नुकसान, हळूहळू रिकव्हरी.
advertisement
1/7

गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. चांदीने विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर आता दरात घसरण झाली असली, तरी दररोज किमतींमध्ये वेगाने बदल होत आहेत.
advertisement
2/7
आज, शनिवारी सोन्याच्या दरात १९ हजारहून अधिक वाढ झाली आहे. तसं पाहायला गेलं तर 4 लाख 20 हजार रुपये चांदीचे दर पोहोचले होते. मात्र फुगा फुटला आणि दर गडगडले. आता चांदीचे दर 2 लाख 71 हजार रुपयांच्या आसपास आले आहेत.
advertisement
3/7
मागच्या काही दिवसांमध्ये सोन्या चांदीच्या दरांनी अक्षरश: धुमाकूळ घातला होता. अचानक दर कोसळले आणि गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले. मात्र आता पुन्हा हळूहळू रिकव्हरी होत आहे. आज पुन्हा एकदा विकेण्डला सोनं चांदी महाग झाली आहे.
advertisement
4/7
२४ कॅरेट सोन्याचे दर १ लाख ५९ हजार रुपयांच्या आसपास आहेत तर २२ कॅरेट सोन्याचे दर १ लाख ४६ हजार रुपयांच्या आसपास प्रति तोळा आहेत. १८ कॅरेट सोन्याचे दर १ लाख १९ हजार रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत.
advertisement
5/7
९९९ कॅरेट सोन्याचे दर 2 लाख ७१ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. तर GST सह हे दर 2 लाख 63 हजार रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. चांदीच्या दरात विकेण्डला वाढ झाली आहे.
advertisement
6/7
भारतात सोने आणि चांदी हे केवळ गुंतवणुकीचे साधन नसून ते आपल्या परंपरांशी घट्ट जोडलेले आहेत. समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या धातूंची खरेदी सण-उत्सव आणि लग्नकार्यात आवर्जून केली जाते.
advertisement
7/7
पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही परंपरा आजही कायम असून, भारतीय कुटुंबांमध्ये या धातूंना भावनिक आणि सामाजिकदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. भविष्यातील सुरक्षित भांडवल म्हणूनही या मौल्यवान धातूंकडे पाहिले जातं
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Gold Silver Price Today: काही तासांत पुन्हा 19857 रुपयाांनी वाढली चांदी, सोन्याच्या दराचं काय झालं?