TRENDING:

सोन्या-चांदीच्या किंमतीत हाहाकार! चांदीच्या दरात आजही पडझड, सोन्याचा भाव काय?

Last Updated:
Silver Price Today: आज सलग शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी चांदीच्या किंमतींमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. चला पाहूया चांदीच्या किंमतीत कितीची घसरण झाली आहे.
advertisement
1/6
सोन्या-चांदीच्या किंमतीत हाहाकार! चांदीच्या दरात आजही पडझड, सोन्याचा भाव काय?
Gold Silver Rate: सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून चांदीचं वाढलेल्या किमतींचं वादळ हे हळुहळू शमताना दिसतंय. आज सलग दुसऱ्या दिवशी चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. सोन्याच्या किंमतीही कमी झाल्या आहेत.
advertisement
2/6
एमसीएक्सवर चांदीमध्ये सकाळी 9 वाजता 15,000 रुपये प्रति किलोची घसरण पाहायला मिळाली. चांदीचा दर आता 2,29,872 रुपयांवर आला आहे.
advertisement
3/6
MCX एक्सचेंज रेटवर चांदीने 6% ने घसरण नोंदवली आहे. आज सोन्यातही 0.82% ने घसरण दिसून येत आहे. सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1,50,675 रुपयांवर पोहोचली आहे.
advertisement
4/6
यापूर्वी, एमसीएक्सवर एप्रिल 2026 रोजी एक्सपायर होणारा सोन्याचा वायदा करार गुरुवारी प्रति 10 ग्रॅम 1,52,260रुपयांवर बंद झाला. हा दर त्याच्या विक्रमी उच्चांकी 1,80,779 प्रति 10 ग्रॅमपेक्षा सुमारे 28,500 रुपयांनी कमी होता. तसंच, गुरुवारी स्थानिक बाजारात एमसीएक्स सोन्याच्या किमतीत थोडीशी वाढ दिसून आली.
advertisement
5/6
दरम्यान, एमसीएक्स चांदीच्या किमती प्रति किलो 2,46,452 रुपयांवर बंद झाल्या, जे त्याच्या ऑल-टाइम 4,20,048 प्रति किलोपेक्षा सुमारे 1,73,500 रुपयांनी कमी आहे. महत्वाचं म्हणजे एमसीएक्सवर सोने आणि चांदी दोन्ही गेल्या शुक्रवारीच या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचले होते.
advertisement
6/6
सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण का झाली? : अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी होत असल्याचे दिसून येत असल्याने आज सोने आणि चांदीच्या किमतींवर दबाव आहे. मिंटच्या मते, सेबी-रजिस्टर्ड मार्केट एक्सपर्ट अनुज गुप्ता यांनी सांगितले की, दोन्ही देशांनी संभाव्य अणु करारावर वाटाघाटी सुरू करण्याची घोषणा केली आहे, ज्याची पहिली चर्चा आज (शुक्रवार) होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
सोन्या-चांदीच्या किंमतीत हाहाकार! चांदीच्या दरात आजही पडझड, सोन्याचा भाव काय?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल