सोन्या-चांदीच्या किंमतीत उसळी! चांदीच्या किंमतीत मोठी वाढ, पाहा लेटेस्ट भाव
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
सोनं आणि चांदीच्या किंमतीत आज 20 फेब्रुवारील रोजी जोरदार उसळी पाहायला मिळतेय. सोन्याचा भाव एमसीएक्सवर ओपन होताच वाढला आहे. जाणून घेऊया काय सुरु आहेत भाव...
advertisement
1/6

Gold Silver Prices: सोनं आणि चांदीच्या किंमतींमध्ये आज 20 फेब्रुवारीला मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. सोन्याचा रेट एमसीएक्सवर ओपन होताच 519 रुपयांनी वाढून 155338 रुपये प्रति 10 ग्रामवर ट्रेड करत आहे.
advertisement
2/6
या व्यतिरिक्त चांदीचा भाव आज 3095 रुपयांच्या बढतीसह 244488 प्रति किलोग्रामवर व्यवहार करत आहे. इंटरनॅशनल मार्केटविषयी बोलायचं झाल्यास सोन्याच्या भावात घसरण दिसतेय. तर चांदीमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. आज सोनं आणि चांदीच्या रेटमध्ये तेजीमागे एक महत्त्वाचं कारण आहे. ते म्हणजे यूएस आणि ईरान यांच्यात सुरु असलेला तणाव आहे.
advertisement
3/6
कॉमॅक्सवर सोन्याचा भाव 0.23 टक्के वाढीसह 5009 डॉलर प्रति औंसवर दिसतोय आणि सिल्व्हर 0.01 टक्के तेजीसह 77.645 डॉलर प्रति औंसवर काम करत आहे. आता पाहूया वेगवेगळ्या शहरांमध्ये सोने आणि चांदीचा लेटेस्ट भाव काय आहे.
advertisement
4/6
सोन्या-चांदीच्या किमती वाढतच राहतील का? : अमेरिका-इराण अणुप्रक्रिया चर्चा आणि रशिया-युक्रेन वाटाघाटी यासारखे जागतिक घटक सोन्याला पाठिंबा देत आहेत. शिवाय, अमेरिकन डॉलर मजबूत झाला आहे.
advertisement
5/6
मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष आणि संशोधन विश्लेषक जतिन त्रिवेदी म्हणाले की सोन्याचे भाव ₹1.56 लाखांच्या आसपास स्थिर राहिले. व्याजदर कपातीच्या विलंबामुळे आणि नफा वसुलीमुळे किमती लक्षणीयरीत्या वाढू शकल्या नाहीत. त्यांनी स्पष्ट केले की कॉमेक्सवर सोन्याचा प्रतिकार $5,000–$5,025 प्रति औंस आहे, तर सपोर्ट $4,925 प्रति औंस मिळू शकते.
advertisement
6/6
त्यांनीह असंही म्हटलंय की, जियोपॉलिटिकल परिस्थिती आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरांविषयी संकेतामुळे बाजारात चढ-उतार जारी राहील. मौल्यवान धातूंव्यतिरिक्त, ऊर्जा बाजार देखील कमोडिटी बाजारातील तेजीच्या पुढील फेरीचे संकेत देत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
सोन्या-चांदीच्या किंमतीत उसळी! चांदीच्या किंमतीत मोठी वाढ, पाहा लेटेस्ट भाव