TRENDING:

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खुशखबर! सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण, पाहा आजचा दर

Last Updated:
सोन्या-चांदीच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार होत आहेत. दरम्यान आज गुढीपाडवा आहे. या सणाच्या दिवशी सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. चला पाहूया काय सुरू आहे भाव...
advertisement
1/7
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खुशखबर! सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण, पाहा आजचा दर
आज महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण आनंदात साजरा केला जात आहे. या शुभ मुहूर्तावर अनेकजण हे नवीन वस्तू खरेदी करतात. यामध्ये सोनं खरेदी करणाऱ्यांची संख्याही जास्त असते. दरम्यान सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. कारण आजच्या शुभ मुहूर्तावर सोनं आणि चांदीच्या किंमतीत सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळत आहे. एमसीएक्सवर 10 ग्राम सोन्याचा दर 916 रुपयांनी खाली येऊन 152064 वर ट्रेड करत आहे.
advertisement
2/7
चांदीच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळाली. चांदी 3740 रुपयांनी घसरूण 244454 रुपये प्रति किलोग्रामवर एमसीएक्सवर व्यवहार करत आहे.
advertisement
3/7
इंटरनॅशनल मार्केटमध्येही गोल्ड-सिल्व्हरच्या किंमती कमी झाल्या आहेत. गोल्डमध्ये 0.91 टक्क्यांच्या घसरणीसह 4851 डॉलर प्रति औंसवर आला आहे. सोबतच सिल्व्हरमध्ये 2.55 टक्के कमी होऊन 75.615 डॉलर प्रति औंसवर आहे.
advertisement
4/7
आज प्रमुख शहरांत सोन्याचे दर : मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, 22-कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम भाव 144740 रुपयांवर पोहोचला आहे. मुंबई आणि कोलकातामध्ये भाव 144590 रुपये आहे. बंगळूरमध्येही भाव 144590 रुपये आहे. भोपाळमध्ये 22-कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम भाव 144640 रुपये असून, लखनऊमध्ये भाव 144740 रुपये आहे.
advertisement
5/7
सोन्यात का घसरण होतेय : टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, LKP Securities चे व्हीपी रिसर्च अॅनालिस्ट Jateen Trivedi नुसार, सोनं 5000 डॉलरच्या खाली कमजोर असून तो 4985 डॉलरच्या आसपास स्थिरावला आहे. व्याजदर कपातीच्या कमी अपेक्षा आणि मजबूत डॉलर हे याचे कारण आहे.
advertisement
6/7
सोबतच महागडे कच्चे तेल आणि US-इराण तणावामुळे महागाईची चिंता वाढली आहे. ज्यामुळे फेड दीर्घकाळापर्यंत उंज व्याजदर कायम ठेवू शकतात. फेड कठोर नियम अवलंबत असेल तर सोन्यावर आणखी दबाव येऊ शकतो. कारण उच्च व्याजदरात सोन्याची मागणी कमी होते.
advertisement
7/7
एमसीएक्स गोल्ड देशांतर्गत बाजारात कमजोर व्यवहार करतेय. त्याला 1,58,000 रुपयांच्या जवळ रेजिस्टेंस लेव्हल आणि ₹1,52,000–1,50,000 रुपयांदरम्यान सपोर्ट आहे. येत्या काही दिवसांत बाजारात अस्थिरता अपेक्षित आहे. फेडचा निर्णय हा पुढील प्रमुख घटक ठरण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खुशखबर! सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण, पाहा आजचा दर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल