Gold Rate Today: सोनं झालं स्वस्त, आज 24 कॅरेटला किती मोजावे लागणार?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Gold Silver Rate Today: गेल्या काही काळात सोन्या-चांदीच्या दरांत सातत्याने चढ-उतार होत आहेत. आज नाशिक सराफा बाजारात सोन्याच्या दरात घट झालीये.
advertisement
1/5

गेल्या काही काळात सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. मागील आठवड्यात ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला होता. परंतु, मंगळवारी सोन्याच्या दरात 1200 रुपयांची वाढ झाली होती. नाशिक सराफा बाजारात आज सोनं पुन्हा स्वस्त झालंय.
advertisement
2/5
नाशिक सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात 200 रुपयांची घट झालीये. त्यामुळे 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 86 हजार 700 रुपयांवर आला आहे.
advertisement
3/5
मंगळवारी सोन्याचे दर 1200 रुपयांच्या वाढीसह 86 हजार 900 रुपयांवर होते. तर जीएसटीसह 89 हजार 507 रुपये मोजावे लागत होते. आज त्यात घट झालीये.
advertisement
4/5
चांदीच्या भावातही प्रतिकिलो 1 हजार रुपयांची वाढ झाली होती. आज पुन्हा चांदीच्या दरात 1 हजारांची घट झाली असून प्रति किलोसाठी आज 96 हजार 600 रुपये मोजावे लागणार आहेत.
advertisement
5/5
दरम्यान, आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे देशांतर्गत सोन्याच्या भावात चढ उतार वाढ होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचा फटका सोन्याच्या बाजारपेठेवर होत आहे. पुढील काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होतेय.