Gold Rate Today: आज सोनं स्वस्त की महाग, 10 ग्रॅमसाठी किती मोजावे लागणार पैसे?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Gold Silver Rate Today: गेल्या काही काळात सोन्या-चांदीच्या दरांत सातत्याने चढ-उतार होत आहेत. आज नाशिक सराफा बाजारात सोन्याच्या दरांत पुन्हा वाढ झालीये.
advertisement
1/5

गेल्या काही काळात सोन्या-चांदीच्या दरांत सातत्याने चढ-उतार होत असून सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे ऐन लग्नसराईच्या काळात सोनं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावत आहे. अशातच आज सोन्याच्या दरांत पुन्हा वाढ झालीये.
advertisement
2/5
नाशिक सराफा बाजारात सोन्याच्या दरात बुधवारी काहीशी घट झाली होती. परंतु, आज सोनं 600 रुपयांनी महाग झालंय. त्यामुळे 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्यासाठी आज 88 हजार 17 रुपये मोजावे लागणार आहेत. तर 22 कॅरेटचा भाव 80 हजार 687 रुपयांवर असणार आहे.
advertisement
3/5
गेल्य आठवड्यात सोन्याच्या दरांत काहीशी घसरण झाली होती. परंतु, या आठवड्यात पुन्हा सोनं महागलं आहे. आज 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्यासाठी 8801 रुपये मोजावे लागतील.
advertisement
4/5
मागील काही दिवसांत चांदीच्या दरात देखील चढ-उतार जाणवत आहेत. आज चांदीच्या दरात देखील वाढ झाली असून 1 किलो चांदीचे भाव 1 लाख 300 रुपयांवर गेले आहेत.
advertisement
5/5
अलिकडच्या काळात सोन्याच्या किमती वाढत आहेत, ज्याचे मुख्य कारण जागतिक आर्थिक अस्थिरता आणि व्यापारी तणाव आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीनवर नवीन कर जाहीर केल्यानंतर बाजारात अनिश्चितता वाढली आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक वाढत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Gold Rate Today: आज सोनं स्वस्त की महाग, 10 ग्रॅमसाठी किती मोजावे लागणार पैसे?