TRENDING:

HDFC Bankने केले मोठे 4 बदल! थेट तुमच्या खिशावर होईल परिणाम, अवश्य वाचा

Last Updated:
HDFC Bank ने आपल्या ग्राहकांसाठी चार मोठे बदल केले आहेत. बँकेने लोनचे व्याजदर, फिक्स्ड डिपॉझिटचे व्याजदर, एटीएममधून पैसे काढण्याचे नियम आणि लॉकर भाड्याशी संबंधित नियमांत बदल केले आहेत.
advertisement
1/6
HDFC Bankने केले मोठे 4 बदल! थेट तुमच्या खिशावर होईल परिणाम, अवश्य वाचा
HDFC Bank ने आपल्या ग्राहकांसाठी चार मोठे बदल केले आहेत. बँकेने लोनचे व्याजदर, फिक्स्ड डिपॉझिटचे व्याजदर, एटीएममधून पैसे काढण्याचे नियम आणि लॉकर भाड्याशी संबंधित नियमांत बदल केले आहेत. HDFC Bank ने आपल्या ग्राहकांसाठी चार मोठे बदल केले आहेत.
advertisement
2/6
बँकेने लोनेच व्याजदर, फिक्स्ड डिपॉझिटचे व्याजदर, एटीएममधून पैसे काढण्याचे नियम आणि लॉकर भाड्याशी संबंधित नियमांमध्ये बदल केले आहेत. यामदून काही बदल पहिलेच लागू झाले आहेत. तर काही 1 एप्रिल 2026 पासून लागू होतील. या बदलांचा परिणाम देशातील लाखो बँक ग्राहकांवर पडू शकतो.
advertisement
3/6
कर्ज स्वस्त करण्यासाठी MCLRमध्ये कपात : एचडीएफसी बँकेने त्यांच्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट (एमसीएलआर) मध्ये 10 बेसिस पॉइंट्सपर्यंत कपात केली आहे. नवीन दर 7 मार्च 2026 पासून लागू झाले आहेत. या कपातीनंतर, एका दिवसाचा आणि एका महिन्याचा एमसीएलआर 8.25% वरून 8.15% पर्यंत कमी झाला आहे. तीन महिन्यांचा एमसीएलआर 8.30% वरून 8.25% पर्यंत कमी झाला आहे. सहा महिन्यांचा आणि एका वर्षाचा दरही 8.40% वरून 8.35% पर्यंत कमी झाला आहे. दोन वर्षांचा एमसीएलआर 8.50% वरून 8.45% पर्यंत कमी झाला आहे आणि तीन वर्षांचा एमसीएलआर 8.60% वरून 8.55% पर्यंत कमी झाला आहे. या बदलामुळे ज्या ग्राहकांना कर्जे एमसीएलआरशी जोडली आहेत त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. त्यांना त्यांच्या ईएमआयवर काही दिलासा मिळू शकतो.
advertisement
4/6
FD वर वाढवले गेले व्याजदर : बँकेने काही पीरियडच्या FD वर व्याजदर वाढवले आहेत. 3 वर्षे 1 दिवसांपासून 4 वर्षे 7 महिन्याच्या पीरियडच्या एफडीवर व्याजदर 6.40% ने वाढून 6.50% केले आहेत. सीनियर सिटिझनसाठी या पीरियडच्या FD वर व्याजदर 6.90% ने वाढवून 7% केले आहेत. सध्या बँक सामान्य ग्राहकांना 2.75% ते 6.50% पर्यंत आणि सीनीयर सिटिझनला 3.25% ते 7% पर्यंत व्याज देत आहे.
advertisement
5/6
ATMमधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल : HDFC Bankनेही त्यांचे ATM नियम बदलले आहेत. 1 एप्रिल 2026 पासून, UPI वापरून एटीएममधून पैसे काढणे मंथली फ्री व्यवहार ट्रांझेक्शन समाविष्ट केले जाईल. जर ग्राहकांनी मोफत व्यवहार मर्यादा ओलांडली तर त्यांना प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी 23 रुपये आणि टॅक्स आकारला जाईल.
advertisement
6/6
लॉकर चार्जही वाढतील : बँकेने सेफ डिपॉझिट लॉकरच्या भाड्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिल 2026 पासून नवीन दर लागू होतील. बँकेने यासाठी Metro Plus नावाची नवी कॅटेगिरी सुरु केली आहे. नवीन सिस्टम अंतर्गत लॉकरचं भाडं लॉकरची साइज आणि ब्रांचच्या लोकेशनच्या आधारावर ठरते. यामध्ये Metro Plus, Metro, Urban, Semi-Urban आणि Rural कॅटेगिरी सामिल असेल. या व्यतिरिक्त लॉकर भाड्यावर 18% जीएसटीही लागू होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
HDFC Bankने केले मोठे 4 बदल! थेट तुमच्या खिशावर होईल परिणाम, अवश्य वाचा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल