TRENDING:

Property Rules : विवाहित मुलीचा वडिलोपार्जित मालमत्तेवर हक्क असतो? हिंदू उत्तराधिकार कायदा काय सांगतो?

Last Updated:
भारतीय संविधानाने महिलांना समानता दिली आणि 1956 मध्ये तयार करण्यात आलेल्या "हिंदू उत्तराधिकार कायद्यानं" (Hindu Succession Act) या दिशेने एक क्रांतिकारी पाऊल टाकलं.
advertisement
1/9
विवाहित मुलीचा वडिलोपार्जित मालमत्तेवर हक्क असतो? कायदा काय सांगतो?
भारतातील समाजात दीर्घकाळापासून मुलांच्या तुलनेत मुलींना मालमत्तेच्या हक्कांपासून वंचित ठेवण्यात आलं होतं. पण बदलत्या काळात आणि महिलांच्या समान हक्कांच्या लढ्यामुळे या परिस्थितीत मोठा बदल झाला. भारतीय संविधानाने महिलांना समानता दिली आणि 1956 मध्ये तयार करण्यात आलेल्या "हिंदू उत्तराधिकार कायद्यानं" (Hindu Succession Act) या दिशेने एक क्रांतिकारी पाऊल टाकलं.
advertisement
2/9
या कायद्याने हिंदू समाजातील वैयक्तिक आणि कौटुंबिक मालमत्तेचे नियम स्पष्टपणे निश्चित केले आणि स्त्रियांना त्यात समान हक्क दिले. चला तर मग जाणून घेऊया. या कायद्याखाली मुलींना कोणते अधिकार मिळतात आणि ते कसे लागू होतात.
advertisement
3/9
जर एखादी व्यक्ती आपला उत्तराधिकारी न ठरवता किंवा मृत्यूपत्र न बनवता मरण पावली, तर तिची मालमत्ता कायद्यानुसार तिच्या वारसांमध्ये विभागली जाते.
advertisement
4/9
वडिलांच्या मृत्यूनंतर आई आणि आईच्या मृत्यूनंतर मुलगा आणि मुलगी दोघांनाही समान हिस्सा मिळतो. जर मुलगा किंवा मुलगी आधीच मरण पावले असतील, तर त्यांचा हक्क त्यांच्या कायदेशीर वारसांकडे (म्हणजे नातू, नात) हस्तांतरित होतो. या विभागणीमध्ये आई-वडिलांच्या आईवडिलांनाही म्हणजेच आजोबा, आजी यांनाही हिस्सा मिळतो.
advertisement
5/9
संयुक्त कुटुंब आणि मुलींचे हक्कहिंदू कायद्यानुसार संयुक्त कुटुंब (Hindu Undivided Family - HUF) ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. ती एका वंशातील सर्व वंशज आणि त्यांच्या कुटुंबीयांचा समूह असतो. या कुटुंबातील दोन प्रकारचे सदस्य असतात, एक सहदायिक (Coparceners) म्हणजे ज्यांना जन्मानेच वडिलोपार्जित मालमत्तेवर हक्क असतो. दुसरी सदस्य (Members) म्हणजे लग्नानंतर कुटुंबात येणाऱ्या महिला (पत्नी).
advertisement
6/9
पूर्वी फक्त मुलांनाच सहदायिक हक्क मिळत असे, पण 2005 मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीमुळे मुलींनाही जन्मापासूनच सहदायिक हक्क मिळू लागले. म्हणजेच मुलगी आता वडिलोपार्जित मालमत्तेत मुलासारखीच समान हक्कदार ठरते.
advertisement
7/9
लग्नानंतरही कायम राहतो हक्कअनेकांना वाटतं की मुलगी लग्नानंतर आपल्या माहेरच्या मालमत्तेवरील हक्क गमावते पण ते चुकीचं आहे. लग्नानंतरही मुलगी आपल्या जन्माच्या हिंदू अविभाजित कुटुंबात सहदायिक राहते. मात्र, लग्नानंतर ती ज्या कुटुंबात जाते, त्याठिकाणी तिला सदस्यत्व मिळतं. जर मुलीचं निधन झालं, तर तिचा मालमत्तेतील हिस्सा तिच्या कायदेशीर वारसांना म्हणजेच पती, मुलं, किंवा पालक यांना मिळतो.
advertisement
8/9
संयुक्त कुटुंबातील मालमत्तेचा विभाजन झाल्यानंतर मुलीचा हिस्सा तिची वैयक्तिक संपत्ती बनतो. या मालमत्तेवर तिचा पूर्ण अधिकार असतो. ती इच्छेनुसार ती विकू शकते. मात्र ती जिवंत असताना ती ही संपत्ती उपहार (Gift) म्हणून देऊ शकत नाही. मात्र वसीयत तयार करून ती मृत्यूपश्चात आपला हिस्सा कोणाला द्यायचा ते ठरवू शकते.जर मुलगी वसीयत न करता मरण पावली, तर तिचा हिस्सा हिंदू उत्तराधिकार कायद्याच्या कलम 6 नुसार तिच्या वारसांना मिळतो.
advertisement
9/9
महिलांच्या सशक्तीकरणाचा पायाहिंदू उत्तराधिकार कायद्यामुळे महिलांना केवळ मालमत्तेचा हक्क मिळाला नाही, तर स्वावलंबन आणि आर्थिक अधिकारांची हमी मिळाली.आज मुलीला तिच्या वडिलोपार्जित मालमत्तेवर पूर्ण हक्क आहे. ती विकू शकते, ठेवू शकते किंवा वसीयत करून दुसऱ्याला देऊ शकते. हा बदल भारतीय समाजात लैंगिक समानतेकडे वाटचाल करणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Property Rules : विवाहित मुलीचा वडिलोपार्जित मालमत्तेवर हक्क असतो? हिंदू उत्तराधिकार कायदा काय सांगतो?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल