TRENDING:

स्वस्त सोनं खरेदीची संधी! होळीनंतर दरात मोठी घसरण, 22 आणि 24 कॅरेटचे पाहा दर

Last Updated:
जळगावात शुक्रवारी सोनं 91 हजार रुपयांच्या आसपास पोहोचलं होतं. सोने जीएसटीसह 90 हजार 200 तर चांदी देखील एक लाख रुपयांहून अधिक होती. महाराष्ट्रात जळगावचं सोनं खूप प्रसिद्ध आहे. जळगावला सुवर्णनगरीही म्हटलं जातं. इथे दरवाढ झाल्यानंतर सर्वसामान्य ग्राहकांचं बजेट कोलमडणार असं दिसत आहे.
advertisement
1/7
स्वस्त सोनं खरेदीची संधी! होळीनंतर दरात मोठी घसरण, 22 आणि 24 कॅरेटचे पाहा दर
मुंबई: होळीच्या रंगीबेरंगी वातावरणात सोने आणि चांदीचीही झळाळी वाढल्याचं पाहायला मिळालं, मात्र ही दरवाढ फारकाळ टिकली नाही. होळी आणि धुळवडीनंतर शनिवारी सकाळी सोन्याचे दर उतरले. देशभरातील अनेक राज्यांमध्ये सोन्याने शुक्रवारी पहिल्यांदाच ९० हजारांचा आकडा ओलांडला, तर चांदीनेही एक लाख रुपये प्रति किलोचा टप्पा ओलांडला.
advertisement
2/7
पाटलीपुत्र सराफा संघाच्या दर समितीचे निमंत्रक मोहित गोयल म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून बाजारात 'फ्लॅट लाईन ट्रेडिंग' सुरू होते, परंतु व्यापाऱ्यांना आधीच अंदाज होता की होळी येईपर्यंत सोने आणि चांदी त्यांचे खरे रंग दाखवतील आणि तेच घडले. या होळीला सोन्याच्या तेजाने आणि चांदीच्या तेजाने सर्वांना आश्चर्यचकित केले. रंगांपूर्वी, लोक बाजारात वाढत्या किमतींबद्दल चर्चा करत आहेत.
advertisement
3/7
जळगावात शुक्रवारी सोनं 91 हजार रुपयांच्या आसपास पोहोचलं होतं. सोने जीएसटीसह 90 हजार 200 तर चांदी देखील एक लाख रुपयांहून अधिक होती. महाराष्ट्रात जळगावचं सोनं खूप प्रसिद्ध आहे. जळगावला सुवर्णनगरीही म्हटलं जातं. इथे दरवाढ झाल्यानंतर सर्वसामान्य ग्राहकांचं बजेट कोलमडणार असं दिसत आहे.
advertisement
4/7
शहरातील सुवर्ण बाजारात शुक्रवारी सोन्याच्या दराने नवीन उच्चांक प्रस्थापित केला. दर ९१ हजार ४६४ रुपये प्रतितोळा (जीएसटीसह) झाला. सोन्याच्या दरातील ही आजपर्यंतची सर्वोच्च वाढ असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितलं.
advertisement
5/7
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अनेक देशांवर वाढीव आयात शुल्क आकारण्यात येत आहे. यातून जागतिक व्यापार युद्धाच्या शक्यतेने निर्माण झालेल्या अनिश्चिततेत, सुरक्षित पर्याय असलेल्या सोन्याकडे ओढा वाढल्याने सुरू असलेल्या दरातील तेजीने शुक्रवारी कळस गाठला आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याने प्रति औंस ३ हजार डॉलरच्या अभूतपूर्व पातळीपुढे झेप घेतली.
advertisement
6/7
मुंबईत, नवी मुंबईत 999 शुद्ध 24 कॅरेट 10 ग्रॅम सोनं 89 हजार, 791 रुपये आहे. तर 23 कॅरेट सोनं 87 हजार 900 रुपयांच्या आसपास आहे. 22 कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना 82 हजार 310 रुपये मोजावे लागणार आहेत.
advertisement
7/7
ऐन सणासुदीच्या काळात, गुढीपाडव्याआधी सोन्याच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. शेअर मार्केट कोसळत असल्याने सोनं खरेदी करण्याकडे गुंतवणूकदार वळले आहेत. वाढलेली मागणी, मार्केटमधील अस्थिरता याचा परिणामही सोन्या चांदीच्या दरांवर झाल्याचं दिसून आलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
स्वस्त सोनं खरेदीची संधी! होळीनंतर दरात मोठी घसरण, 22 आणि 24 कॅरेटचे पाहा दर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल