TRENDING:

पेट्रोल पंपावर फक्त झिरो बघून काही होणार नाही, बघा 'ही' गोष्ट; अन्यथा फसलाच म्हणून समजा

Last Updated:
Checking Petrol Diesel Purity : पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना अनेकांची फसवणूक होते. ही फसवणूक टाळता यावी म्हणून काही गोष्टींकडे लक्ष देणं खुप गरेजचं असतं. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या गोष्टी...
advertisement
1/8
पेट्रोल पंपावर फक्त झिरो बघून काही होणार नाही, बघा 'ही' गोष्ट; अन्यथा फसलाच म्हणून समजा
Petrol-Diesel Density : पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी नेहमीच जात असाल तर काही गोष्टींकडे लक्ष देणे हे अत्यंत महत्त्वाचं असतं. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. यासाठी नेहमी जागृक राहणँ हे गरजेचं असतं.
advertisement
2/8
पेट्रोल भरताना अनेक लोक हे आधी झिरो बघतात. पण फक्त झिरो बघूनच फसवणूक टाळता येते असं तुम्हाला वाटतं का? असं वाटत असेल तर तुम्ही चूकत आहात. पेट्रोल पंपावर झिरो पाहणं महत्त्वाचं आहे. पण फक्त झिरो पाहूनच काम होत नाही. तुम्हाला यासोबत आणखी एक गोष्ट पाहावी लागेल.
advertisement
3/8
तुम्ही पेट्रोल पंपावर झिरो तर बघाल पण तुम्हाला देत असलेलं पेट्रोल भेसळयुक्त असेल तर काय? पण आता भेसळयुक्त पेट्रोल कसं ओळखायचं? तर यासाठी एक भारी ट्रिक आहे. तुम्ही फक्त पाहूनच पेट्रोलची प्योरिटी म्हणजेच शुद्धता चेक करू शकता.
advertisement
4/8
आज आम्ही तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलच्या शुद्धतेबद्दल महत्त्वाची माहिती देत ​​आहोत, जेणेकरून तुम्हाला पुरेशा प्रमाणात शुद्ध इंधन मिळेल. तुमच्या वाहनाच्या दीर्घायुष्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही पंप मीटर पाहून पेट्रोलची शुद्धता तपासू शकता. होय, शुद्धता निर्देशांक (प्युरिटी इंडेक्स) सुद्धा पंप मीटरवर दिसतो.
advertisement
5/8
कशी चेक करावी पेट्रोल-डिझेलची डेंसिटी? : पेट्रोल-डिझेलची डेन्सिटी त्याच्या शुद्धतेशी संबंधित आहे. जी तुम्ही सहज चेक करू शकता. सरकारने फ्यूल डेन्सिटीचे स्टँडर्ड ठरवलेले आहेत. ज्याच्या मदतीने तुम्ही ओळखू शकता की, पेट्रोल किती शुद्ध आहे. कारण अनेकदा इंधनाच भेसळ असल्याच्या तक्रारी येतात.
advertisement
6/8
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इंधनाची डेन्सिटी कशी तपासावी. हे तपासण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही, कारण ही माहिती पेट्रोल पंपावरच दिलेली असते. पेट्रोलच्या पावतीवरही डेन्सिटी दाखवलेली असते. तुमचे समाधान झाले नाही, तर तुम्ही पंपावर उपलब्ध असलेल्या डेन्सिटी जारने याची तपासणी करू शकता.
advertisement
7/8
इंधनासंबंधित डेन्सिटी स्टँडर्ड : प्रत्येक पदार्थाचं एक ठरलेली डेन्सिटी असते. इंधनाच्या बाबतीतही तेच असतं. सरकारने पेट्रोल-डिझेलची डेन्सिटीचे स्टँडर्ड ठरवलेले आहेत. पेट्रोलची डेंसिटी 730 ते 800 किलोग्राम प्रति घन मीटर आहे. तसंच डिझेलची शुद्धतेची डेन्सिटी 830 ते 900 किग्रा/एम3 दरम्यान सांगितले आहे. खरंतर याची रेजं फिक्स नसते आणि तापमानातील बदल याचं कारण असतं.
advertisement
8/8
मात्र, तुम्हाला निर्धारित मर्यादेपेक्षा कमी घनतेचे पेट्रोल मिळाल्यास, तुम्ही तक्रार करू शकता. 1986 च्या ग्राहक संरक्षण कायद्यानुसार, प्रत्येक ग्राहकाला पेट्रोलची शुद्धता तपासून घेण्याचा अधिकार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
पेट्रोल पंपावर फक्त झिरो बघून काही होणार नाही, बघा 'ही' गोष्ट; अन्यथा फसलाच म्हणून समजा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल