डेबिट-क्रेडिट कार्डचं पिन सिक्योर कसे ठेवायचे? हे आहेत सोपे फॉर्म्यूले
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Debit Credit Card Pin Secure : सध्याच्या काळात जवळपास प्रत्येकाचे बँकेत अकाउंट आहे. ज्यांचे बँकेत अकाउंट आहेत, त्यांचं डेबिट कार्ड आहेच. तर अनेकांचे क्रेडिट कार्डही आहेत. याचे पिन कसे सिक्योर ठेवायचे पाहूया...
advertisement
1/6

तुमच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डचं पिन तयार करताना लक्षात ठेवा की तो युनिक असायला हवा. यासोबतच तुमच्या डेली लाइफमध्ये यूज होणाऱ्या पासवर्डशी अजिबात जुळू नये. म्हणजेच तुमचा फोन लॉक किंवा ईमेल पासवर्ड. 1234 किंवा 0000 सारख्या अनुक्रमांकांसारखे पासवर्ड अजिबात ठेवू नका. असा पासवर्ड हॅक करणं सोपं असतं.
advertisement
2/6
पिन जेनरेट करत असाल तर नेहमी रँडम सिक्वेंस निवडावा. पण हे करताना कोणाला याचा अंदाज लावता येणार नाही असं ते करायला हवं. पासवर्डमध्ये नेहमी संख्या आणि अक्षरांचा कॉम्प्लेक्स असू द्या.
advertisement
3/6
तुमच्या कार्डचा पिन किंवा अकाउंट पासवर्ड नेहमी मोठाच असायला पाहिजे. असे पासवर्ड क्रॅक करणे हॅकर्सला कठीण जातं. हा पिन 6 ते 8 अंकांचा असू द्या, असं तज्ञ सांगतात. तसेच, तुम्ही तुमचा पिन नियमित अंतराने बदलत राहा. यामुळे तो अधिक सुरक्षित होईल.
advertisement
4/6
ईमेल किंवा फोनवर फिशिंग कॉलसह तुमचे कार्ड डिटेल्स किंवा पिन शेअर करणं टाळा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, तुम्ही जास्त ट्रांझेक्शन करत असाल तर दर महिन्याला तुमचा पासवर्ड किंवा पिन बदलत राहा. अन्यथा 6 महिन्यात तर अवश्य बदला.
advertisement
5/6
कार्डवर तुमचा पिन किंवा पासवर्ड कधीच लिहू नका. तो नेहमी लक्षात ठेवायला हवा. तुमचे कार्ड आणि पिन नेहमी सुरक्षित ठेवा. तसंच कोणाशीही शेअर करू नये. बँकेच्या कर्मचाऱ्यासोबतही शेअर करु नका.
advertisement
6/6
गर्दीच्या ठिकाणी असलेलं एटीएम वापरणे सहसा टाळा. अशा ठिकाणी तुमचा पिन सुरक्षित ठेवणे कठीण असतो. तुम्ही मोबाईल बँकिंग वापरत असाल, तर फिंगरप्रिंट किंवा फेस रेकग्निशन यांसारखे फिचर्स अॅक्टिव्हेट ठेवा.