TRENDING:

भारतीय तरुणाला UAE मध्ये 240 कोटींची लॉटरी, नंबर निवडण्यासाठी वापरली अशी ट्रिक, नशिबानं केलं मालामाल

Last Updated:
त्याने 18 ऑक्टोबर रोजी झालेल्या लकी डे ड्रॉ मध्ये तब्बल 100 दशलक्ष दिरहम (सुमारे 240 कोटी रुपये) जिंकले आहेत. हा यूएई लॉटरी इतिहासातील सर्वात मोठा बक्षीस रक्कम आहे.
advertisement
1/8
240 कोटींची लॉटरी, नंबर निवडण्यासाठी वापरली अशी ट्रिक, तरुण झाला मालामाल
नशिब कधी, कोणाचं आयुष्य बदलून टाकेल हे कोणालाच ठाऊक नसतं. काहीजण वर्षानुवर्ष मेहनत करून थोडंसं यश मिळवतात, तर काहींवर नशीब असं हसतं की एका छोट्याशा तिकिटाने सगळं बदलून जातं. अशीच एक गोष्ट घडली आहे अबू धाबीमध्ये राहणाऱ्या एका भारतीय तरुणासोबत. 29 वर्षांचा अनिलकुमार बोळा नावाचा भारतीय युवक अबू धाबीमध्ये राहतो. त्याने 18 ऑक्टोबर रोजी झालेल्या लकी डे ड्रॉ मध्ये तब्बल 100 दशलक्ष दिरहम (सुमारे 240 कोटी रुपये) जिंकले आहेत. हा यूएई लॉटरी इतिहासातील सर्वात मोठा बक्षीस रक्कम आहे.
advertisement
2/8
लॉटरी संस्थेने अनिलकुमारचा विजयाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यात तो आनंद साजरा करताना दिसतो. त्याला मोठा चेक देण्यात आला आणि त्याने आपल्या लकी नंबरमागचं रहस्य सांगितलं. तो म्हणाला “मी काही खास विचार करून नंबर घेतला नव्हता. ‘ईझी पिक’ निवडला होता. पण शेवटचा नंबर माझ्या आईच्या वाढदिवशी जुळला आणि तीच माझी खरी लकी गोष्ट ठरली.”
advertisement
3/8
जिंकलेली बातमी ऐकताना त्याचा विश्वासच बसला नाही. “मी सोफ्यावर बसलो होतो. जेव्हा कळलं की मी जिंकलो आहे, तेव्हा माझे हातपाय थरथरत होते. तो क्षण आयुष्यभर विसरणार नाही,” असं तो म्हणाला.
advertisement
4/8
अनिलकुमारने सांगितलं की तो हे पैसे विचारपूर्वक वापरणार आहे. “मला ही रक्कम योग्य पद्धतीने गुंतवायची आहे. आता माझ्याकडे पैसा आहे, पण त्याचा उपयोग योग्य गोष्टींसाठी करायचा आहे. काहीतरी मोठं करायचं आहे,” असं त्याने सांगितलं.
advertisement
5/8
स्वतःसाठी सुपरकार घ्यायची आणि आलिशान हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करायचा असा त्याचा विचार आहे, पण त्याचं सर्वात मोठं स्वप्नाबद्दल सांगताना तो म्हणाला, “माझ्या कुटुंबाला यूएईमध्ये आणायचं आणि त्यांच्यासोबत संपूर्ण आयुष्य आनंदात घालवायचं.”
advertisement
6/8
तो जिंकलेल्या रकमेतील काही भाग दान करणार आहे. तसेच इतर लॉटरी खेळाडूंना त्याने सल्ला दिला की "नशीबावर विश्वास ठेवा, प्रयत्न करत राहा. एक दिवस तुमचंही नशीब उजळेल."
advertisement
7/8
अनिलकुमारने यूएई लॉटरीचे आभार मानले आणि म्हणाला, “ही माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे. अशी संधी अनेकांच्या आयुष्यात आनंद घेऊन यावी हीच माझी इच्छा आहे.”
advertisement
8/8
याआधीही सप्टेंबर महिन्यात संदीपकुमार प्रसाद नावाच्या दुसऱ्या भारतीयाने दुबईतील लॉटरीत 15 दशलक्ष दिरहॅम (सुमारे 35 कोटी रुपये) जिंकले होते. म्हणजेच, यूएईमध्ये भारतीयांसाठी सध्या नशिबाचं सोनं बरसतंय असंच म्हणावं लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
भारतीय तरुणाला UAE मध्ये 240 कोटींची लॉटरी, नंबर निवडण्यासाठी वापरली अशी ट्रिक, नशिबानं केलं मालामाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल