IRCTC Tour: केवळ 50 हजारांत करु शकता थायलंडची सैर! 6 दिवसांच्या टूरमध्ये मिळतील या सुविधा
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
IRCTC Tour: तुम्ही या वर्षी परदेशवारी करण्याचा प्लान करत असाल तर आयआरसीटीसी तुमच्यासाठी शानदार टूर पॅकेज घेऊन आले आहे. हा टूर थायलंडसाठी आहे.
advertisement
1/8

IRCTC Thailand Tour Package: थायलंड हे पूर्व आशियातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. दरवर्षी भारतातून लाखो पर्यटक थायलंडला भेट देण्यासाठी जातात.
advertisement
2/8
भारतीय रेल्वेच्या IRCTC ने पिंक सिटी जयपूर ते थायलंडसाठी खास आणि परवडणारे टूर पॅकेज आणले आहे.
advertisement
3/8
हे पॅकेज एकूण 6 दिवस आणि 5 रात्रींसाठी आहे. यामध्ये तुम्हाला बँकॉक आणि पटायाला भेट देण्याचीही संधी मिळेल. यासोबतच सफारी वर्ल्ड, मरीन पार्क, क्रूझ आणि अनेक प्रकारची बौद्ध मंदिरे पाहण्याची संधीही पर्यटकांना मिळणार आहे.
advertisement
4/8
हे एक फ्लाइट पॅकेज आहे ज्यामध्ये तुम्हाला जयपूर ते बँकॉक पर्यंत राउंड ट्रिप फ्लाइट तिकीट मिळेल.
advertisement
5/8
या पॅकेजमध्ये तुम्हाला मीलमध्ये नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची सुविधा मिळेल.
advertisement
6/8
तुम्हाला प्रत्येक ठिकाणी राहण्यासाठी हॉटेलची सुविधा मिळेल. यासोबतच सर्व लोकांना ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि टूर गाईडचीही मदत मिळणार आहे.
advertisement
7/8
या टूरवर तुम्ही एकटे गेल्यास 61,995 रुपये, दोन व्यक्तींना 54,860 रुपये आणि तीन जणांना 54,869 रुपये प्रति व्यक्ती शुल्क द्यावे लागेल.
advertisement
8/8
IRCTC चे हे टूर पॅकेज 25 ऑगस्टपासून सुरू होत आहे. या टूर पॅकेजमध्ये पर्यटक पाच दिवस प्रवास करणार आहेत. टूर पॅकेज 30 ऑगस्ट रोजी संपणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
IRCTC Tour: केवळ 50 हजारांत करु शकता थायलंडची सैर! 6 दिवसांच्या टूरमध्ये मिळतील या सुविधा