TRENDING:

इराण-अमेरिका युद्धामुळं शेअर बाजारात ब्लॅक मंडे, सेन्सेक्स २५०० अंकांनी कोसळला, ३ सेक्टरला सर्वात मोठा फटका

Last Updated:
इराण-अमेरिका-इस्रायल युद्धामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेंसेक्स २५०० अंकांनी, निफ्टी ७०० अंकांनी कोसळला. तेलाच्या किमतीत २५% वाढ झाली. रुपया ९२.२५ वर घसरला.
advertisement
1/7
इराण-अमेरिका युद्धामुळं शेअर बाजारात ब्लॅक मंडे, सेन्सेक्स २५०० अंकांनी कोसळला
इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्ध आता निर्णायक वळणावर पोहोचलं असून, त्याचे भीषण परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर दिसू लागले आहेत. सोमवारी बाजार उघडताच भारतीय शेअर बाजारात भूकंप झाला. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली २५ टक्क्यांची वाढ आणि युद्धाचा वाढता भडका यामुळे सेंसेक्स २५०० हून अधिक अंकांनी कोसळला, तर निफ्टीमध्ये ७०० पेक्षा जास्त अंकांची मोठी घसरण पाहायला मिळाली. या एकाच झटक्यात गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये मातीमोल झाले.
advertisement
2/7
युद्धाच्या ठिणगीमुळे ब्रेंट क्रूड ऑईलच्या किमतीने प्रति बॅरल ११६ डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी रोखल्यास तेल १५० डॉलरपर्यंत जाऊ शकतं, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तेल महागल्याचा अर्थ असा की, भारत जो आपल्या गरजेचं ८५% तेल आयात करतो, त्याचं बजेट पूर्णपणे कोलमडणार आहे.
advertisement
3/7
बाजार कोसळताच जवळपास सर्वच सेक्टरमध्ये लाल निशाण दिसू लागलं. प्रामुख्याने ज्या कंपन्यांना इंधनाचा जास्त खर्च येतो, त्यांचे शेअर्स धडाधड कोसळले. इंडिगो एअरलाईन इंधनाचे दर वाढण्याच्या भीतीने ५ टक्क्यांनी घसरला.
advertisement
4/7
एशियन पेंट्स ऑईल डेरिव्हेटिव्ह महाग होणार असल्याने ४ टक्क्यांची घसरण झाली. बँकिंग सेक्टरमध्ये एसबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स ३ टक्क्यांहून अधिक पडले. अदानी पोर्ट्स आणि एलअँडटी या कंपन्यांना जागतिक व्यापार विस्कळीत झाल्याचा फटका या शेअर्सना बसला.
advertisement
5/7
केवळ शेअर बाजारच नाही, तर भारतीय रुपयाचीही अवस्था बिकट झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया ४३ पैशांनी घसरून ९२.२५ च्या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. रुपया कमकुवत झाल्यामुळे आता परदेशातून येणारी प्रत्येक वस्तू महाग होणार आहे.
advertisement
6/7
हे संकट केवळ भारतापुरतं मर्यादित नाही. आशियाई बाजारात जपानचा निक्केई ६.२ टक्क्यांनी तर दक्षिण कोरियाचा बाजार ७.३ टक्क्यांनी कोसळला आहे. अमेरिका आणि युरोपमधील बाजारही मोठ्या घसरणीच्या तयारीत आहेत.
advertisement
7/7
बाजारातील या अनिश्चिततेमुळे इन्वेस्टर्स'मध्ये भीतीचं वातावरण आहे. जोपर्यंत युद्ध थांबण्याचे किंवा तेलाचे दर स्थिर होण्याचे संकेत मिळत नाहीत, तोपर्यंत बाजारातील ही स्थिती कायम राहू शकते, असा इशारा विश्लेषकांनी दिला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
इराण-अमेरिका युद्धामुळं शेअर बाजारात ब्लॅक मंडे, सेन्सेक्स २५०० अंकांनी कोसळला, ३ सेक्टरला सर्वात मोठा फटका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल