TRENDING:

Korean Currency : कोरीयात रुपयाला किंमत किती? भारताचे 1 लाख घेऊन गेलो तर कोरियात श्रीमंत होऊ का?

Last Updated:
Korean Currency : दक्षिण कोरियासारख्या प्रगत देशात जायचं झालं, तर भारतीय रुपया तेथील चलनाच्या तुलनेत किती मूल्यवान ठरेल, हे जाणून घेणं रंजक ठरतं.
advertisement
1/7
कोरीयात रुपयाला किंमत किती? भारताचे 1 लाख घेऊन गेलो तर कोरियात श्रीमंत होऊ का?
परदेशात प्रवास करायचा म्हटलं की, तेथील चलन आणि आपल्या पैशाची किंमत किती होईल हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. विशेषतः दक्षिण कोरियासारख्या प्रगत देशात जायचं झालं, तर भारतीय रुपया तेथील चलनाच्या तुलनेत किती मूल्यवान ठरेल, हे जाणून घेणं रंजक ठरतं. चला तर मग पाहूया भारताचे ₹1,00,000 दक्षिण कोरियामध्ये किती होतील आणि कोरियन चलनाविषयी काही महत्त्वाची माहिती जाणून घेऊया.
advertisement
2/7
भारताचे ₹1,00,000 कोरियात किती होतील?सध्याच्या विनिमय दरानुसार 1 भारतीय रुपया = सुमारे 16.21 दक्षिण कोरियन वॉन (KRW) एवढा आहे. म्हणजेच, भारतातील ₹1,00,000 = सुमारे 16,21,448 वॉन होतात. त्याचप्रमाणे, जर तुम्ही कोरियात 50,000 वॉन कमावले, तर त्याची किंमत भारतात सुमारे ₹3,083 एवढी होईल.
advertisement
3/7
दक्षिण कोरियाचं चलन “वॉन (₩)”दक्षिण कोरियाची अधिकृत चलन एकक वॉन (Won) म्हणून ओळखली जाते, ज्याचा ISO कोड KRW असा आहे. हे चलन सियोलस्थित ‘बँक ऑफ कोरिया’ द्वारे जारी केलं जातं.
advertisement
4/7
वॉनचं मूळ विभाजन 100 “जॉन” (Jeon) मध्ये केलं गेलं असलं, तरी वाढत्या महागाईमुळे (inflation) आज “जॉन” व्यवहारातून पूर्णपणे बाहेर पडला आहे. दक्षिण कोरियामध्ये सर्व प्रकारचे व्यवहार वॉनमधूनच केले जातात.
advertisement
5/7
दक्षिण कोरियामध्ये वॉन नोटा आणि नाणी दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहेत.नोटा: 1,000 – 5,000 – 10,000 – 50,000 वॉननाणी: 10 – 50 – 100 – 500 वॉन
advertisement
6/7
कोरियन चलन आपल्या प्रगत बनावट-रोधक (Anti-Counterfeit) तंत्रज्ञानासाठी जगभर ओळखले जाते. नोटांवर होलोग्राफिक पट्ट्या, रंग बदलणारी शाई, सूक्ष्म मुद्रण (micro printing) आणि टेक्सचरयुक्त पृष्ठभाग अशा सुरक्षात्मक वैशिष्ट्यांचा वापर केला जातो.
advertisement
7/7
आधुनिक वॉनची सुरुवात 1962 साली झाली. मात्र, याचं मूळ दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात आहे. 1945 मध्ये जपानी अधिपत्य संपल्यानंतर दक्षिण कोरियाने स्वतःचं स्वतंत्र चलन म्हणून वॉन स्वीकारलं. पण कोरियन युद्धाच्या काळात वाढलेल्या महागाईमुळे जुनं चलन बदलून नव्या स्वरूपात “मॉडर्न वॉन” आणण्यात आलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Korean Currency : कोरीयात रुपयाला किंमत किती? भारताचे 1 लाख घेऊन गेलो तर कोरियात श्रीमंत होऊ का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल