लाडक्या बहिणींनो हप्ता आला नाही? चिंता करू नका! 181 फिरवा, अडकलेले पैसे मिळवा, वाचा संपूर्ण प्रोसेस
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील तांत्रिक अडचणींमुळे हप्ता न मिळालेल्या महिलांसाठी आदिती तटकरे यांनी १८१ हेल्पलाईन सुरू केली आहे, त्यामुळे मदत मिळणार आहे.
advertisement
1/8

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता न आल्याने अनेक बहि‍णींची चिंता वाढली आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी देखील अनेकांनी विनंती केली आहे. KYC करुनही हप्ता न आल्याने आता लाडक्या बहि‍णींची मदत सरकार करणार आहे. लाखो महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा होत असतानाच, दुसरीकडे हजारो अशाही महिला आहेत ज्यांचे अर्ज पात्र असूनही तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्या पदरात निराशाच पडली.
advertisement
2/8
ई-केवायसी करूनही महिना संपला तरी खात्यात पैसे का आले नाहीत? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी महिला बँका आणि सेतू केंद्रांचे उंबरठे झिजवत होत्या. पण आता या लाडक्या बहिणींची पायपीट थांबणार आहे. राज्य सरकारने या सर्व तक्रारींचे निवारण करण्यासाठी १८१ हेल्पलाईन सुरू केली आहे.
advertisement
3/8
योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात अनेक अपात्र अर्ज आले होते, त्यामुळे पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने सर्व लाभार्थ्यांना ई-केवायसी पूर्ण करणे सक्तीचे केले होते. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण करताना घाईघाईत अनेक महिलांकडून चुका झाल्या.
advertisement
4/8
मोबाईलवर माहिती भरताना किंवा केंद्रावर फॉर्म अपडेट करताना चुकीचा पर्याय निवडल्या गेल्याने अनेकांचे लाभ स्थगित झाले आहेत. काहींची बँक खाती आधारशी लिंक नसल्याने किंवा तांत्रिक बिघाडामुळे ई-केवायसी पूर्ण होऊनही हप्ता अडकला आहे.
advertisement
5/8
अनेक दिवसांपासून लाभार्थी महिलांकडून या तक्रारी केल्या जात होत्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्वीट करुन हेल्पलाईनची घोषणा केली. त्यांनी स्पष्ट केले की, ज्या महिलांचे हप्ते तांत्रिक कारणास्तव थांबले आहेत किंवा ज्यांना ई-केवायसी करताना अडचणी येत आहेत, त्यांच्या शंकांचे निरसन आता १८१ या क्रमांकावर केले जाईल.
advertisement
6/8
जिल्हा परिषद निवडणुकांचे वारे वाहत असतानाच सरकारने घेतलेला हा निर्णय राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा मानला जात आहे. पण सामान्य महिलेसाठी हा क्रमांक एक मोठा आधार ठरला आहे. आता महिलांना कोणत्याही कार्यालयात रांगा लावण्याची गरज नाही. १८१ वर कॉल करून महिला खालील गोष्टींची मदत घेऊ शकतात.
advertisement
7/8
हप्ता का जमा झाला नाही? याची अचूक माहिती मिळवता येईल. चुकीची माहिती कशी दुरुस्त करावी? याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. ई-केवायसी अपडेट: मोबाईलवरून प्रक्रिया पूर्ण करताना अडचण येत असल्यास त्याचे निराकरण होईल.
advertisement
8/8
आजही राज्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या महिलांना तांत्रिक माहिती नसल्यामुळे योजनेचा लाभ मिळत नाहीये. अशा वेळी हा हेल्पलाईन क्रमांक खऱ्या अर्थाने या लाडक्या बहि‍णींसाठी आधार ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
लाडक्या बहिणींनो हप्ता आला नाही? चिंता करू नका! 181 फिरवा, अडकलेले पैसे मिळवा, वाचा संपूर्ण प्रोसेस