TRENDING:

लाडक्या बहि‍णींची झोप उडाली, या महिलांची नाव अर्जातून कायमची बाद, तुमच्याकडे उरले फक्त काही तास

Last Updated:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसीची आज शेवटची तारीख असून, हजारो महिलांनी केंद्रांवर गर्दी केली आहे. तांत्रिक अडचणींमुळे चिंता आणि गोंधळ वाढला आहे.
advertisement
1/7
लाडक्या बहि‍णींची झोप उडाली, या महिलांची नाव अर्जातून कायमची बाद
नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सर्वत्र सुरू असली, तरी राज्यातील लाखो महिलांसाठी आजचा दिवस सेलिब्रेशनचा नसून चिंतेचा ठरला आहे. राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ कायम ठेवण्यासाठी ई-केवायसी करण्याची आज ३१ डिसेंबर ही शेवटची तारीख आहे.
advertisement
2/7
आज मध्यरात्रीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण न झाल्यास दरमहा मिळणारी १५०० रुपयांची हक्काची मदत कायमची बंद होऊ शकते. याच भीतीपोटी आज सकाळपासूनच राज्यातील गावोगावी असलेल्या सुविधा केंद्रांवर महिलांनी अक्षरशः गर्दी केली आहे.
advertisement
3/7
योजना सुरू झाली तेव्हा निवडणुकीच्या धावपळीत पात्रतेच्या अटींची कडक तपासणी होऊ शकली नव्हती. याचा फायदा घेत अनेक अपात्र व्यक्तींनीही या योजनेत घुसखोरी केल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक म्हणजे, काही सरकारी कर्मचारी, पुरुष आणि आर्थिकदृष्ट्या सधन व्यक्तीही या योजनेचा लाभ घेत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे.
advertisement
4/7
या बोगस लाभार्थ्यांमुळे सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक ताण येत आहे. हाच गैरप्रकार रोखण्यासाठी आणि केवळ खऱ्या गरजू महिलांनाच पैसा मिळावा, यासाठी सरकारने केवायसी प्रक्रिया सक्तीची केली आहे. आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच सुविधा केंद्रांवर महिलांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक महिला पहाटेपासूनच रांगेत उभ्या आहेत. मात्र, एकाच वेळी हजारो महिलांनी पोर्टलचा वापर केल्यामुळे सरकारी सर्व्हरवर प्रचंड ताण आला असून प्रणाली संथ गतीने चालत आहे.
advertisement
5/7
काही ठिकाणी तर सर्व्हर डाऊन झाल्यामुळे केंद्रांवरील मशीन बंद पडल्या, ज्यामुळे महिलांना मनस्ताप सहन करावा लागला. तासनतास रांगेत उभं राहूनही काम होत नसल्याने अनेक ठिकाणी संताप आणि चिंतेचे वातावरण पाहायला मिळाले. प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही तांत्रिक अडचणी आणि माहितीच्या अभावामुळे अनेक महिलांची केवायसी अद्याप प्रलंबित आहे.
advertisement
6/7
आज रात्रीनंतर पोर्टल बंद होण्याची शक्यता असल्याने, ज्यांचे काम राहिले आहे त्या महिलांची धाकधूक वाढली आहे. ई-केवायसीमुळे पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांची पारदर्शक छाननी होणार असून, बोगस लाभार्थ्यांची नावे कायमची यादीतून वगळली जातील.
advertisement
7/7
या मुदतीनंतर नेमक्या किती महिलांनी ही अट पूर्ण केली आणि किती जणी या लाभापासून वंचित राहिल्या, याचे चित्र उद्या स्पष्ट होईल. मात्र, तोपर्यंत आपल्या खात्यात १५०० रुपये जमा होत राहतील का? या एकाच विचाराने 'लाडक्या बहिणीं'ची झोप उडाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
लाडक्या बहि‍णींची झोप उडाली, या महिलांची नाव अर्जातून कायमची बाद, तुमच्याकडे उरले फक्त काही तास
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल