TRENDING:

Gold Rateमध्ये होऊ शकतो मोठा उलटफेर! ट्रम्पने टॅरिफ घटवल्यानंतर सोन्याच्या किंमती बदलणार?

Last Updated:
Gold Rate Updates : भारत आणि अमेरिकेमध्ये ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब झाला आहे. पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रंप यांनी काल रात्री फोनव चर्चा केली आणि ट्रंप यांनी भारतावर लावल्या जाणाऱ्या टॅरिफमध्ये कपात केली आहे. यामुळे सोन्याच्या किंमतीत पुढे काय परिणाम होईल पाहूया...
advertisement
1/8
Gold Rateमध्ये होणार बदल! ट्रम्पने टॅरिफ घटवल्यानंतर सोन्याच्या किंमती बदलणार?
सोन्याच्या दागिने आणि रत्नांची आवड असणाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप आणि भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्यापारी करारावर चर्चा केली. सोमवारी रात्री भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापार करारविषयी फोनवर चर्चा झाली. ज्यानंतर ट्रंप यांनी भारतावर टॅरिफ कमी केला आहे.
advertisement
2/8
अमेरिकेचे राष्ट्रापती डोनाल्ड ट्रंप यांनी भारतावर टॅरिफ कमी करुन भारताला गुड न्यूज दिली आहे. यापूर्वी रशियाने तेल खरेदीवर भारताच्या नाराजीनंतर ट्रंप यांनी टॅरिफ वाढवले होते. आता व्यापार करारामुळे टॅरिफ 50 टक्केवरुन 18 टक्के केले आहे. यामुले भारतीयांना मोठा दिलासा मिळाली आहे. यासोबतच सोन्याची आवड असणाऱ्यांसाठीही गुड न्यूज आहे.
advertisement
3/8
ट्रम्प प्रशासनाने भारतीय रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीवरील शुल्क 50% वरून 18% पर्यंत कमी केले आहे. अमेरिका ही भारताची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ असल्याने भारतीय रत्ने आणि दागिने उद्योगासाठी हा एक मोठा दिलासा आहे. तज्ञांचा असा विश्वास आहे की या शुल्क कपातीमुळे सोन्याच्या किमतीतही घट होण्याची शक्यता आहे.
advertisement
4/8
भारतातील रत्ने आणि दागिने क्षेत्र दरवर्षी अमेरिकेला अंदाजे 10 अब्ज डॉलर्स (अंदाजे 83,000 कोटी रुपये) निर्यात करते. यापैकी हिऱ्यांचा वाटा 7-8 अब्ज डॉलर्स आहे. देशातील लाखो लोकांच्या उपजीविकेचा आधार हा क्षेत्र आहे. तसंच, अमेरिकेने 50 टक्क्यांपर्यंत शुल्क वाढवल्यामुळे गेल्या सहा महिन्यांत निर्यातीत मोठी घट झाली आहे. एप्रिल-डिसेंबर 2025 या कालावधीत अमेरिकेतील निर्यात 44.42 टक्क्यांनी घसरून 3.86 अब्ज डॉलर्सवर आली, जी गेल्या वर्षी याच कालावधीत 6.95 अब्ज डॉलर्स होती. डिसेंबर 2025 मध्ये निर्यातीत 50.44 टक्के घट नोंदली गेली.
advertisement
5/8
भारतीय निर्यातदारांसाठी हा कर आता 18% पर्यंत कमी करण्यात आला आहे, जो एक मोठा दिलासा आहे. भारताने अमेरिकन उत्पादनांवरील कर आणि अडथळे कमी करण्यासाठीही पावले उचलली आहेत. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार संबंध सुधारण्याची अपेक्षा आहे. रत्न आणि दागिने निर्यात प्रोत्साहन मंडळाने या निर्णयाचे स्वागत केले. मंडळाने म्हटले आहे की, 'भारत सरकार अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करारांवर वाटाघाटी करत आहे. यामुळे नवीन बाजारपेठा उघडतील आणि जागतिक स्तरावर भारताची क्वालिटी, मूल्य आणि विश्वास मजबूत होईल.'
advertisement
6/8
या टॅरिफ कपातीमुळे भारतीय रत्ने आणि दागिने निर्यातदारांची स्पर्धात्मकता वाढेल. पहिले 50% टॅरिफमुळे निर्यात खर्च खुप जास्त होता. ज्यामुळे लहान नर्यातदारांवर ओझं पडत होतं. यामुळे मालची डिलिव्हरीमध्ये उशीर, नोकऱ्यांचं नुकसान आणि नफ्यासारख्या समस्या निर्माण होत होत्या. आता 18% टॅरिफसह निर्यात सोपी होईल. यामुळे उद्योगात रोजगार सुरक्षित राहील आणि नवीन संधी खुल्या होतील.
advertisement
7/8
सोन्याच्या किमतींवर काय परिणाम होईल? अमेरिकेच्या आयात शुल्क कपातीमुळे भारताची निर्यात वाढली तर सोन्याची मागणी थोडी कमी होऊ शकते. यामुळे सोन्याच्या किमतीत घट होण्याची शक्यता आहे. सोन्याच्या किमती वाढल्यामुळे ज्यांनी दागिन्यांची खरेदी कमी केली होती ते आता त्यांची खरेदी पुन्हा सुरू करू शकतात. यामुळे रत्ने आणि दागिने क्षेत्रात उत्साह निर्माण होईल.
advertisement
8/8
या निर्णयामुळे भारतातील रत्ने आणि दागिने उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे लाखो लोकांच्या उपजीविकेला आधार मिळतो आणि राज्य आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक बातमी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Gold Rateमध्ये होऊ शकतो मोठा उलटफेर! ट्रम्पने टॅरिफ घटवल्यानंतर सोन्याच्या किंमती बदलणार?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल