टॅक्सपेयर्स लक्ष द्या! 1 किंवा 2 नाही, तर 8 प्रकारच्या असतात इन्कम टॅक्स नोटीस
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
मुंबई : तुम्ही तुमचा आयटीआर दाखल करताना उत्पन्न लपवले असेल, करबचत गुंतवणुकीचा पुरावा दिला नसेल, क्रेडिट कार्डवर जास्त खर्च केला असेल किंवा विभागाच्या नोंदींशी जुळत नसलेल्या आर्थिक व्यवहारात सहभागी झाला असाल, तर तुम्हाला निश्चितच आयकर नोटीस मिळेल. तसंच, अनेक लोकांना आयकर नोटीस मिळण्याचा उद्देश माहित नाही, कारण प्रत्येक सूचनाचा अर्थ वेगळा असतो.
advertisement
1/9

तुमचे वार्षिक उत्पन्न करपात्र असेल, तर आयटीआर दाखल करणे अनिवार्य आहे. अन्यथा, तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस मिळू शकते. पण तुम्हाला माहित आहे का की, बहुतेक नोटीस फक्त तुमच्या रिटर्नमधील कमतरता ओळखण्यासाठी किंवा स्पष्टीकरण मागण्यासाठी असतात? तुम्ही उत्पन्न लपवले असेल, करबचत गुंतवणुकीचा पुरावा दिला नसेल, मोठे बँक व्यवहार केले असतील, क्रेडिट कार्डवर जास्त खर्च केला असेल किंवा विभागाच्या नोंदींशी जुळत नसलेल्या इतर आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले असेल, तर तुम्हाला निश्चितच नोटीस मिळेल. म्हणून, तुम्हाला आयकर सुचना किती प्रकारच्या असतात हे समजून घेणं गरजेचं आहे.
advertisement
2/9
कलम 139(9) नोटीस: तुमच्या आयटीआरमध्ये त्रुटी किंवा कमतरता असेल, तर ती सदोष रिटर्न मानली जाईल. यासाठी, आयकर विभाग तुम्हाला कलम 139(9) ची नोटीस देखील पाठवतो.
advertisement
3/9
कलम 133 (6) ची नोटीस - तुमचे उत्पन्न मूळ सूट मर्यादेपेक्षा जास्त असेल किंवा तुम्ही तुमचा आयटीआर दाखल केला नसेल तर आयकर विभाग तुम्हाला कलम 133 (6) ची नोटीस पाठवतो. शिवाय, तुमचे उत्पन्न तुमच्या आयटीआरमध्ये योग्यरित्या नोंदवले गेले नसेल किंवा तुमचे खर्च तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त असतील तर आयकर विभाग ही नोटीस पाठवू शकतो.
advertisement
4/9
आयकर कलम 142(1) ची नोटीस - तुमच्या आयकर रिटर्नमध्ये केलेल्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी विभागाला तुमच्या रिटर्नशी संबंधित अधिक माहितीची आवश्यकता असते तेव्हा ही नोटीस पाठवली जाते. तुम्ही तुमचा आयटीआर दाखल केला नसेल तर देखील ही नोटीस पाठवली जाते.
advertisement
5/9
कलम 143 (1)ची नोटीस - तुमचा आयटीआर सीपीसीद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्रोसेस केला जात असेल तर ही नोटीस पाठवली जाते. विभागाचे उत्पन्न मोजणी तुमच्या रिटर्नशी जुळते की नाही याची माहिती ती प्रदान करते. जेव्हा विभागाचे उत्पन्न मोजणी तुमच्या रिटर्नशी जुळते तेव्हाच ही नोटीस तुम्हाला पाठवली जाते. याला समरी असेसमेंट असेही म्हणतात.
advertisement
6/9
कलम 143 (2) नोटीस - कलम 143 (1) नोटीसनंतर, आयकर विभाग कलम 143(2) नोटीस पाठवतो. एखादी व्यक्ती कलम 143(1) ला प्रतिसाद देत नाही तेव्हा ती पाठवली जाते. प्रतिसाद समाधानकारक नसेल, तर आयकर विभाग करदात्याला आयकर डिटेल्स मागण्यासाठी ही नोटीस पाठवतो.
advertisement
7/9
कलम 148 नोटीस - आयकर विभागाला असे वाटते की, तुम्ही तुमच्या उत्पन्नाचा काही भाग लपवला आहे तेव्हा तो कलम 148 नोटीस पाठवतो. शिवाय, विभागाला असेही वाटू शकते की, तुम्ही तुमच्या उत्पन्नाबाबत चुकीची माहिती दिली आहे.
advertisement
8/9
आयकर कलम 156 नोटीस - असेसमेंट ईयर पूर्ण झाल्यावर टॅक्स, व्याज किंवा पेनल्टीची रक्कम निघाली तर विभाग तुम्हाला डिमांड नोटीस पाठवेल. ही नोटीस आयकर कलम 156 नोटीसअंतर्गत येते.
advertisement
9/9
कलम 245 नोटीस - तुम्हाला एका वर्षासाठी रिटर्न मिळतो आणि तुमचा कर दुसऱ्या वर्षासाठी देय असतो तेव्हा कलम 245 नोटीस पाठवली जाते. विभाग त्या प्रलंबित कराच्या तुलनेत तुमचा रिफंड अॅडजस्ट करू शकतो. ही माहिती देण्यासाठी ही नोटीस पाठवली जाते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
टॅक्सपेयर्स लक्ष द्या! 1 किंवा 2 नाही, तर 8 प्रकारच्या असतात इन्कम टॅक्स नोटीस