TRENDING:

चांदीच्या किंमतीत आज झाली मोठी घसरण! जाणून घ्या किती रुपयांनी कमी झाल्या किंमती

Last Updated:
Silver Price Today Falls: 5 फेब्रुवारीला चांदीची खरेदी करणाऱ्यांना मोठा दिसाला मिळणार आहे. कारण सध्याच्य सोन्या-चांदीच्या चढ-उताराच्या काळात आज चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे.
advertisement
1/5
चांदीच्या किंमतीत आज झाली मोठी घसरण! जाणून घ्या किती रुपयांनी कमी झाल्या किंमती
Silver Rate Today: आज चांदीची खरेदी करण्याचा प्लॅन करणाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. कारण आज 5 फेब्रुवारी रोजी चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या किंमतींमध्ये वेगाने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. ज्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांपासून मोठ्या गुंतवणुकदारांनाही विचारात टाकले आहे.
advertisement
2/5
दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिका आणि ईरानमधील तणावामुळे सोनं सुरक्षित गुंतवणूक म्हणून बजबूत झालं आहे. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून तेजीनंतर MCX आलेल्या घसरणीमुळे मिडल क्लास कुटुंबाना खरेदीसाठी थोडासा दिलासा मिळाला आहे.
advertisement
3/5
तुम्हीही चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा प्लॅन करत असाल तर सध्याची बाजारातील हालचाली तुम्हाला चकीत करु शकतात. एकेकाळी चांदी ₹4,20,000 प्रति किलोच्या ऑल-टाइम हायवर पोहोचली होती. मात्र आता चांदीच्या किंमती कमी होऊन जवळपास 2,58,096 प्रति किलोवर आल्या आहेत.
advertisement
4/5
आज काय आहे सोन्या-चांदीचा भाव? : आज चांदीचा दर 6% च्या कमी सर्किटवर उघडला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत असलेल्या कॉमेक्सवरही चांदीची घसरण झाली. चांदीचा भाव 9.73% घसरून 76.045 डॉलर प्रति औंस झाला. सोन्यातही घसरण दिसून येत आहे. एमसीएक्सवर सोन्याच्या किमती प्रति 10 ग्रॅम 4000 रुपयांनी कमी झाल्या आहेत. सध्याचा सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 149000 रुपये आहे.
advertisement
5/5
डॉलरच्या मजबूतीनंतर आणि तीक्ष्ण तेजीनंतर नफा बुकिंगमुळे सोने आणि चांदीच्या किमती घसरताय. परंतु आता कमी स्तरावर खरेदी वाढल्यामुळे किंमत थांबली आहे. मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, दिल्लीतील सराफा बाजारात 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 6,280 रुपये आणि 22 कॅरेट सोने 5,760 रुपये महाग झाले आहे. आज, दोन्हीच्या किमती प्रति 10 ग्रॅम 10 रुपयांनी वाढल्या आहेत. चांदीच्या किमतीही सलग दुसऱ्या दिवशी वाढल्या आहेत. आज दिल्लीत चांदी प्रति किलो 100 रुपयांनी वाढली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
चांदीच्या किंमतीत आज झाली मोठी घसरण! जाणून घ्या किती रुपयांनी कमी झाल्या किंमती
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल