मशीन नोटा मोजून गरम झालं, हात रबरबॅण्ड बांधून थकले, तरी पैसे नाही संपले, इंजिनियरच्या घरी सापडलं घबाड
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
भ्रष्टाचाराचं मोठं प्रकरण समोर आलं आहे. शिक्षण विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे मोठ्या प्रमाणात रोकड सापडली आहे.
advertisement
1/7

बेंगळुरू: लोक हे कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करतात असं तुम्ही ऐकलं असेलच. पण जर एखाद्याच्या घरात मोजतानाही हात दुखेल एवढे पैसे असले तर काय? असंच एक प्रकरण बेंगळुरुमधून समोर आलं आहे.
advertisement
2/7
भ्रष्टाचाराच्या विरोधात मोहिन हातात घेतल्यानंतर लोकायुक्त पोलिसांनी शिक्षण विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर निशाणा साधला. उत्पन्नापेक्षा जास्त संपत्तीच्या प्रकणारत केलेल्या या कारवाईमध्ये प्रशासकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
advertisement
3/7
बेंगळुरूच्या लोकायुक्तांनी पीडब्ल्यूडीचे मुख्य अभियंता पुरुषोत्तम यांच्या घरावर मोठा छापा टाकला. गुरुवारी सकाळी पद्मनाभनगर येथील त्यांच्या आलिशान तीन मजली बंगल्यावर दोन वाहनांमध्ये 10 पेक्षा जास्त अधिकाऱ्यांचे पथक गेले होते.
advertisement
4/7
पाच ते सहा तासांपासून सुरू असलेल्या या छाप्यामध्ये लाखो रुपये रोख सापडले. मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने आणि असंख्य मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये 1.7 कोटी रुपये ही फक्त कॅश आहे. तर सोनं हे वेगळं सापडलं आहे.
advertisement
5/7
एकूण बेहिशेबी मालमत्ता 44200000 (4.42 कोटी) इतकी आहे जी त्याच्या उत्पन्नाच्या 216% एवढी आहे. यानंतर मोठी खळबळ उडाली. पैसे मोजता मोजता मशीनही गरम झाले. तर रबर लावत लावत अधिकाऱ्यांचे हातं थकले होते.
advertisement
6/7
लोकायुक्तांना त्यांच्याविरुद्ध बेहिशेबी मालमत्ता आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. सध्या, सर्व कागदपत्रांची तपासणी केली जात आहे आणि ताब्यात घेतलेला वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
advertisement
7/7
कर्नाटक निवासी शैक्षणिक संस्था असोसिएशन (KREIS) चे अधीक्षक अभियंता एचएम जनार्दन यांच्याविरुद्ध बंगळुरु ग्रामीण लोकायुक्त पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा जास्त आणि बेकायदेशीरपणे संपत्ती जमवल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
मशीन नोटा मोजून गरम झालं, हात रबरबॅण्ड बांधून थकले, तरी पैसे नाही संपले, इंजिनियरच्या घरी सापडलं घबाड