photos : बायकोच्या सांगण्यावरुन नोकरी सोडली, कर्ज काढलं अन् व्यवसाय केला सुरू, आज नशीबच पालटलं
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
चांगली नोकरी सोडून व्यवसाय सुरू करणे हे मोठे धाडस आहे. मात्र, एका व्यक्तीने हे धाडस केले. बायकोच्या सांगण्यावरुन एका व्यक्तीने नोकरी सोडली. यानंतर कर्ज काढले आणि स्वत:चा व्यवसाय सुरू केला. यामुळे आज या व्यक्तीचे नशिबच पालटले आहे. व्यवसायाने इंजीनिअर असलेल्या या व्यक्तीची कहाणी आज आपण जाणून घेऊयात. (उधव कृष्ण/पाटणा, प्रतिनिधी)
advertisement
1/9

सुरेंद्र कुमार नीरज असे या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी नोकरी सोडली आणि लोकांना रोजगार देण्याचा निर्णय घेतला. त्यांना त्यांच्या या कार्यात पत्नी विनती कुमारी यांच्यासह आपल्या आई-वडिलांचाही पाठिंबा मिळाला.
advertisement
2/9
सुरेंद्र कुमार नीरज यांच्या पत्नी विनती कुमारी (वय-41) यांनी इतिहासात पदवीचे शिक्षण घेतले आहे. लोकल18 बोलताना त्यांनी सांगितले की, त्यांना इंटरनेटवर पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) बद्दल माहिती मिळाली.
advertisement
3/9
यानंतर त्यांनी आपल्या पतीला कर्जाच्या प्रक्रियेबाबत सांगितले आणि 25 लाख रुपयांचे कर्ज काढत त्यांनी आपली फॅक्टरीला दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केले. तसेच अनेक मशीन्स लावल्या. अखंडित वीज पुरवठा आणि सततच्या मेहनतीचा परिणाम म्हणजे आज त्यांचा पॉलीनेट आता पाटण्यात ब्रँड म्हणून प्रस्थापित झाला आहे.
advertisement
4/9
विनती यांनी सांगितले की, पाटण्याच्या वॉटर टँकच्या या कारखान्याची वार्षिक एक ते दीड कोटी रुपयांची उलाढाल आहे. या कामातून चांगले उत्पन्न मिळण्याबरोबरच अनेकांना रोजगारही मिळत आहे.विनती यांनी सांगितले की, पाटण्याच्या वॉटर टँकच्या या कारखान्याची वार्षिक एक ते दीड कोटी रुपयांची उलाढाल आहे. या कामातून चांगले उत्पन्न मिळण्याबरोबरच अनेकांना रोजगारही मिळत आहे.
advertisement
5/9
बंगळुरूमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुरेंद्र यांनी नागार्जुन फर्ममध्ये मेकॅनिकल इंजिनीअर म्हणून अनेक वर्षे काम केले. त्यांनी सांगितले की, त्यामुळे या कारखान्यात वापरल्या जाणाऱ्या मशिन्सची बरीच माहिती मिळाली.
advertisement
6/9
माझ्या पत्नीविना हा प्रवास शक्य नव्हता. त्यांची पत्नी विनती यांचे असे म्हणणे आहे की, ‘चेंज द क्वालिटी एंड क्वांटिटी विल चेंज यू’ म्हणजे जर क्वालिटीच्या मागे गेल्यावर तुमच्या उत्पादनाचे प्रमाण आपोआप वाढेल, असे ते म्हणाले. जेव्हा त्यांनी 16 वर्षांपूर्वी आपली चांगली नोकरी सोडून व्यवसाय सुरू केला तेव्हा वीज पुरवठ्याअभावी व्यवसायात त्यांचे काही नुकसान झाले.
advertisement
7/9
मात्र, तरीही त्यांनी हार न मानता आपल्या पत्नीच्या मदतीने पाटणा येथील पाटलिपुत्रमधील डीआईसी यांच्या माध्यमातून पीएमईजीपी योजनेचा लाभ घेतला. यासाठी त्यांनी आपल्या पत्नीसोबत 15 दिवसांचा ईडीपी कोर्सही केला. यामुळे त्यांना बिजनेस प्लानिंगची माहिती मिलाली.
advertisement
8/9
सुरेंद्र आपल्या कारखान्यात 500 लीटरपासून 2000 लीटरपर्यंत वॉटर टँक तयार करतात. याची किंमत 2500 पासून 20,000 पर्यंत असते. आता परिस्थिती अशी आहे की, 2500 ते 3000 वॉटर टँकची विक्री होते. त्याचबरोबर आता ते पाण्याच्या टाकीच्या व्यवसायात यशस्वी झाल्यानंतर पॉलिनेट कंपनीचे पीव्हीसी पाइपही तयार करत आहेत.
advertisement
9/9
क्वालिटीमुळे त्यांचे उत्पादनांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. सुरेंद्र यांनी सांगितले की, पाण्याच्या टाकीची गुणवत्ता त्याच्या थरांवर अवलंबून असते. जितके अधिक लेयरिंग तितके पाण्याच्या टाकीची गुणवत्ता चांगली, असे ते म्हणाले. तुम्हीही कोणत्याही प्रकारची माहितीसाठी 9546742759, 9113763619 या मोबाइल नंबरवर आणि polynettank@gmail.com या ईमेलवर संपर्क साधू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
photos : बायकोच्या सांगण्यावरुन नोकरी सोडली, कर्ज काढलं अन् व्यवसाय केला सुरू, आज नशीबच पालटलं