TRENDING:

भाऊ मंत्री, स्वत: एअर होस्टेसची सोडली नोकरी, तरुणीचा मोठा निर्णय, नेमकं काय करतेय?

Last Updated:
असे म्हणतात की, ज्याच्या कुटुंबातील लोकं राजकारणात आहेत किंवा ज्याचं पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे, त्यांचे मुलेही राजकारणात असतात. मात्र, एका तरुणीने एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला आहे. आज आपण याच तरुणीची प्रेरणादायी कहाणी जाणून घेणार आहोत (अंजली सिंह राजपूत/प्रतिनिधी, लखनऊ)
advertisement
1/5
भाऊ मंत्री, स्वत: एअर होस्टेसची सोडली नोकरी, तरुणीचा मोठा निर्णय, नेमकं काय...
ऐश्वर्या लक्ष्मी सिंह असे या तरुणीचे नाव आहे. त्या उत्तरप्रदेशातील तिलोई येथील रहिवासी आहे. त्यांचे वडील विभूति शरण सिंह हे जिल्हा परिषदेचे सदस्य होते. 2020 मध्ये त्यांचे निधन झाले. तर ऐश्वर्या लक्ष्मी सिंह यांचे मोठे भाऊ मयंकेश्वर शरण सिंह हे भारतीय जनता पक्षाचे आमदार बनले आणि उत्तरप्रदेशात राज्यमंत्रीही राहिले.
advertisement
2/5
मात्र, इतकी मोठी परिस्थिती असतानाही ऐश्वर्या लक्ष्मी सिंह यांनी राजकीय ग्लॅमर नाकारून स्वतःहून काहीतरी करण्याचा विचार होता. त्यामुळे त्यांनी कापडांचा व्यवसाय सुरू केला. यामध्ये त्यांनी लखनऊ आणि तिलोईच्या राजस्थानी पोशाखाचे फ्यूजन तयार केले. म्हणजे त्याच्याकडे लखनवी आणि राजपुतानी ड्रेस आहेत, जे ते आणि त्यांची टीम हाताने बनवतात. लोकांना हे कपडे खूप आवडतात.
advertisement
3/5
मार्च 2024 मध्ये त्यांनी आपले स्टार्टअप सुरू केले आणि पहिले प्रदर्शन रविवारी हॉटेल हयातमध्ये भरवले. पहिल्याच प्रदर्शनात त्यांना 30,000 रुपयांहून अधिक नफा झाला. त्या 2025 मध्ये स्वतःचे शोरूम उघडण्याचा विचार करत आहे. हे शोरूम फक्त लखनऊमध्ये उघडले जाईल, असे त्या म्हणाल्या.
advertisement
4/5
त्या तिलोई येथील रहिवासी आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव विभूति शरण सिंह होते. तर आईचे नाव कुंवर पद्मा सिंह असे आहे. त्यांनी पदवीच्या शिक्षणानंतर एका मोठ्या विमान कंपनीत एअर होस्टेसची नोकरी केली. याठिकाणी त्यांचे पॅकेज हे साडे पाच रुपयांपेक्षा जास्त होते. मात्र, त्या या नोकरीमुळे समाधानी नव्हत्या. यामुळे त्यांनी आपला स्वत:चा व्यवसाय सुरू केला.
advertisement
5/5
त्यांच्याकडे शिफॉन, कॉटनच्या साड्या तसेच राजपुताना ड्रेस आहेत, जे राजस्थानातील बहुतेक स्त्रिया परिधान करतात. यासोबतच लवकरच पुरुषांसाठीही त्यांचे कलेक्शन येणार आहे. त्यांच्याकडे 3000 रुपयांपासून 10,000 रुपयांपर्यंतचे कपडे आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. एकीकडे राजकीय कुटुंबातील सदस्य राजकारणात येत असताना त्यांनी हा घेतलेला निर्णय खरंच कौतुकास्पद आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
भाऊ मंत्री, स्वत: एअर होस्टेसची सोडली नोकरी, तरुणीचा मोठा निर्णय, नेमकं काय करतेय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल