TRENDING:

Success Story : टाकाऊ प्लास्टिकपासून पैशाची निर्मिती, वर्षाला दीड कोटींची कमाई, नंदन यांचा बिझनेस फॅार्म्युला!

Last Updated:
या व्यवसायातून पर्यावरणाच्या संरक्षणाबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही केली आहे. त्यांच्या या व्यवसायातून ते वर्षाला कोट्यवधी रुपयांची उलाढाल करत आहेत.
advertisement
1/5
प्लास्टिकपासून पैशाची निर्मिती, दीड कोटींची कमाई, नंदन यांचा बिझनेस फॅार्म्युला!
आजकाल प्लॅस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. अनेकजण वापरलेलं प्लॅस्टिक कुठेही टाकून देतात. ते प्लॅस्टिक वर्षानुवर्षे तसंच राहातं आणि त्यामुळे पर्यावरणाचं मोठं नुकसान होतं. मात्र, काहीजण या समस्यांमध्ये संधी शोधतात. त्यापैकी एक म्हणजे पुण्यातील इकोकारी संस्थापक नंदन भट. भट यांनी टाकून दिलेल्या प्लॅस्टिकमधून एक यशस्वी व्यवसाय उभा केला आहे. या व्यवसायातून पर्यावरणाच्या संरक्षणाबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही केली आहे. त्यांच्या या व्यवसायातून ते वर्षाला कोट्यवधी रुपयांची उलाढाल करत आहेत.
advertisement
2/5
इकोकारीमध्ये काम करणाऱ्या फॅशन डिझायनर गितिका महाजन यांनी सांगितलं की, नंदन भट यांनी इकोकारीची स्थापना 2020 साली केली. काही वर्षांच्या कालावधीत या व्यवसायाने भारतातच नव्हे, तर परदेशातही आपली उत्पादने निर्यात करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 5 ते 6 वर्षांच्या कालावधीत इकोकारीने तब्बल 50 ते 60 लाख टाकून दिलेल्या प्लॅस्टिक वस्तूंचं संकलन करून त्याचा पुनर्वापर केला आहे.
advertisement
3/5
गितिका यांनी सांगितलं की, सुरुवातीला प्लॅस्टिकचे योग्य पद्धतीने संकलन करून त्याचे बर्क्याच्या माध्यमातून सूक्ष्म धाग्यांमध्ये रूपांतर केले जाते. त्यानंतर हे धागे हातमागावर किंवा मशीनच्या साहाय्याने विणून मोठे कापड तयार केले जाते.
advertisement
4/5
या कापडापासून विविध उपयुक्त वस्तू तयार केल्या जातात जसे की पायपुसणे, शोभेच्या वस्तू, लॅपटॉप पिशव्या, बॅगा, डायरी कव्हर, पाकिटं, प्लांटर्स अशा अनेक आकर्षक वस्तू बनवल्या जातात. त्यांच्या या वस्तूंची किंमत साधारणपणे 200 रुपयांपासून ते पाच-सहा हजार रुपयांपर्यंत असते, वस्तूच्या प्रकारानुसार दर ठरतो.
advertisement
5/5
या सर्व वस्तू ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमातून उपलब्ध आहेत. या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली असून, आज या व्यवसायाचा वार्षिक टर्नओव्हर दीड कोटीपेक्षाही जास्त आहे. त्यांच्या या व्यवसायाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कौतुक केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Success Story : टाकाऊ प्लास्टिकपासून पैशाची निर्मिती, वर्षाला दीड कोटींची कमाई, नंदन यांचा बिझनेस फॅार्म्युला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल