TRENDING:

टोल नाक्यावर आता ब्रेकची गरज नाही! तुम्हाला कळण्याआधीच टोल भरला जाणार, गाडी सुस्साट धावणार

Last Updated:
नितीन गडकरी यांनी लोकसभेत सांगितले की देशभरात मल्टी-लेन फ्री फ्लो इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टीम लागू होणार असून वाहनांना टोल प्लाझावर थांबावे लागणार नाही.
advertisement
1/6
टोल नाक्यावर आता ब्रेकची गरज नाही! तुम्हाला कळण्याआधीच टोल भरला जाणार
मुंबई: आता टोल नाक्यावर फास्ट टॅग असेल तरीसुद्धा तो स्कॅन होईपर्यंत एक मिनिटं का असेना थांबावं तर लागतंच, फास्टॅग स्कॅन झाल्यानंतरच पुढे जाता येतं. मात्र आता टोल नाक्यावर थांबण्याची गरज लागणार नाही. देशभरात इलेक्ट्रिक टोल कलेक्शन सिस्टीम लागू केली जाणार आहे.
advertisement
2/6
याचा फायदा ट्रॅफिक न होणं आणि वेळ वाचवण्यासाठी होणार आहे. टोलनाक्यावर होणारं ट्रॅफिक वगळण्यासाठी प्रवास सुरळीत सुरू राहावा यासाठी केला जाणार आहे. पुढच्या एक वर्षात संपूर्ण टोलनाक्यांचं रुपडं बदललं जाईल अशी आशा आहे.
advertisement
3/6
सध्याची सिस्टीम हटवण्यात येणार असून, लवकरच एक नवीन इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टीम देशभरात लागू केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी दिली. या नवीन सिस्टीममुळे वाहनांना टोल प्लाझावर थांबण्याची अजिबात गरज भासणार नाही.
advertisement
4/6
गडकरी यांनी सांगितले की, नवीन इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टीम १० ठिकाणी सुरू करण्यात आली असून, पुढील एका वर्षाच्या आत ही संपूर्ण देशभरात लागू केली जाईल. या नवीन सिस्टीमचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, यामुळे टोल नाक्यांवर होणारी वाहनांची गर्दी आणि थांबणे पूर्णपणे संपणार आहे. प्रवासादरम्यान वाहनांचा वेळ वाचणार असून, इंधनाची बचत होण्यास मदत मिळेल.
advertisement
5/6
सरकारने टोल वसुली अधिक सोपी आणि विनाअडथळा करण्यासाठी मल्टी-लेन फ्री फ्लो इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टीम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रणालीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ऑटोमेटिक नंबर प्लेट रिकग्निशनचा वापर करण्यात आला आहे. वाहनांच्या नंबर प्लेटची आपोआप ओळख पटवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.
advertisement
6/6
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने टोलची प्रक्रिया अधिक जलद आणि अचूक होईल. या तंत्रज्ञानाचाही वापर टोल वसुलीसाठी करण्यात येणार आहे. या नवीन सिस्टीममुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, महामार्गावरील प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होण्याची अपेक्षा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
टोल नाक्यावर आता ब्रेकची गरज नाही! तुम्हाला कळण्याआधीच टोल भरला जाणार, गाडी सुस्साट धावणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल