E KYC चुकलं तर बदलायला 48 तासांची मुदत, नाहीतर लिस्टमधून नाव बाद होणार
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
लाडकी बहीण योजनेसाठी E KYC करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 असून फक्त 2 दिवस शिल्लक आहेत, असे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. 1500 रुपये मिळण्यासाठी हे आवश्यक आहे.
advertisement
1/6

लाडक्या बहिणीसाठी ही शेवटची संधी आहे. फक्त 2 दिवस शिल्लक रहिले आहेत. लाडक्या बहि‍णींसाठी आज E KYC ज्यांनी केलं नाही त्यांनी तातडीनं करुन घ्या. यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम तारीख असून, आता केवळ शेवटचे २ दिवस उरले आहेत.
advertisement
2/6
सर्व लाडक्या बहिणींनी आजच आपली E-Kyc प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती असं आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे. अजूनही नोव्हेंबरपासूनचे पैसे लाडक्या बहि‍णींचे आले नाहीत. मात्र मकरसंक्रांतीपर्यंत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
advertisement
3/6
E KYC केलं नाही किंवा यामध्ये काही चूक झाली तर लाडक्या बहि‍णींना 1500 रुपये मिळणार नाहीत. दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात मात्र ही मदत मिळणं बंद होऊन जाणार आहे. पारदर्शकता आणण्यासाठी हे करण्यात आलं आहे.
advertisement
4/6
याआधी लाडक्या बहि‍णींच्या नावाखाली काही पुरुषांनी आणि सरकारी महिलांनी लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे ही फसवणूक टाळण्यासाठी काही नियम कठोर करण्यात आले आहेत. फसवणूक रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
5/6
ज्या महिलांकडून ई केवायसी करताना काही चुकीचे पर्याय निवडले गेले असतील तर दुरुस्त करण्यासाठी देखील केवळ एक संधी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई केवायसी दुरुस्ती देखील 31 डिसेंबरपर्यंत करता येणार आहे.
advertisement
6/6
लाडकी बहीण योजनेत मुदतवाढ मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 31 जानेवारीपर्यंत ही मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा आदिती तटकरे यांनी केली नाही. त्यामुळे तुम्ही यावर डिपेंड न राहता या दोन दिवसांमध्ये E KYC करुन घ्या.