TRENDING:

PAN Card चे नियम बदलणार! प्रॉपर्टीपासून मोठ्या देवाण-घेवाणीत कुठे गरजेचे?

Last Updated:
PAN Card New Rules 2026: पॅन कार्ड संबंधित नियमांमध्ये 2026 पासून मोठे बदल होणार आहेत. इन्कम टॅक्स विभागाने नवीन ड्राफ्ट नियम जारी केले आहेत. जे 1 एप्रिल 2026 पासून लागू होतील.हे नियम नवीन इन्कम टॅक्स अॅक्ट 2025 अंतर्गत तयार केले गेले आहेत आणि यांचा उद्देश लहान ट्रांझेक्शनमध्ये दिलासा देणे आणि मोठ्या ट्रांझेक्शनवर लक्ष वाढवणे आहे. सध्या हे नियम ड्राफ्ट टप्प्यात आहे आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अंतिम रुप दिले जाऊ शकते. नवीन प्रस्तावानुसार, बँकेमध्ये कॅश जमा किंवा काढण्यावर पॅन दाखवण्याचा नियम बदलेल. 
advertisement
1/6
PAN Card चे नियम बदलणार! प्रॉपर्टीपासून मोठ्या देवाण-घेवाणीत कुठे गरजेचे?
PAN Card New Rules 2026: पॅन कार्ड हे भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचं दस्तावेज आहे. आर्थिक कामांसाठी हे खुप गरजेचे ठरते. 2026 मध्ये पॅन कार्डशी संबंधित नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. हे नियम नवीन पद्धतीने परिभाषित केले जातील. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने नवीन ड्राफ्ट रुल्स जारी केले आहेत. जे 1 एप्रिल 2026 पासून लागू होतील. हे नवीन नियम नवीन इन्कम टॅक्स अॅक्ट 2025 अंतर्गत तयार केले आहेत. मुख्य हेतू लहान-मोठ्या ट्रांझेक्शनमध्ये लोकांना दिलासा देणे आहे आणि मोठ्या व्यवहारांवर नजर ठेवणे आहे. सध्या हा ड्राफ्ट आहे आणि लोकांकडून सल्ला मागितला आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यातपर्यंत हे फायनल होऊ शकते.
advertisement
2/6
बँकांमध्ये रोख रक्कम जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी पॅन कार्डच्या आवश्यकतांबाबतचे नियम बदलत आहेत. सध्या, एकाच दिवसात 50,000 रुपये पेक्षा जास्त रक्कम जमा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी पॅन आवश्यक आहे. आता, ही आवश्यकता संपूर्ण वर्षाच्या एकूण रकमेवर लागू होते. एका आर्थिक वर्षात एक किंवा अधिक बँक खात्यांमधून एकूण 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम जमा केली किंवा काढली गेली तर पॅन अनिवार्य असेल. कमी बॅलन्स असलेल्यांना आता दररोज त्यांचे पॅन कार्ड दाखवण्याची आवश्यकता नाही. यामुळे सामान्य माणसाला मोठा दिलासा मिळेल.
advertisement
3/6
मोटर व्हिकलच्या खरेदीसाठी पॅन कार्ड गरजेचे : गाडी खरेदीचा नियमही सोपा होत आहे. सध्या कोणत्याही मोटर व्हिकलच्या खरेदीवर कितीही किंमत असली तरी पॅन द्यावा लागतो. आता 5 लाख रुपयांहून जास्त किंमतीच्या गाड्या खरेदी केल्यावर पॅन आवश्यक असेल. यामध्ये दुचाकी गाड्यांचाही समावेश आहे. 5 लाखांहून कमीची गाडी खरेदी करणाऱ्यांना पॅन द्यावं लागणार नाही. हा बदल मिड-रेंज आणि लहान गाड्या घरेदी करणाऱ्यांसाठी चांगला आहे.
advertisement
4/6
1 लाख रुपयांपेक्षा जास्त बिलांसाठी पॅन आवश्यक : हॉटेल, रेस्टॉरंट किंवा कार्यक्रमांच्या बिलांसाठीचे नियम देखील बदलत आहेत. सध्या 50 हजार रुपयांपेक्षा जास्त बिलांसाठी पॅन आवश्यक आहे. ही मर्यादा आता 1 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट्स, बँक्वेट हॉल, कन्व्हेन्शन सेंटर किंवा कार्यक्रम व्यवस्थापन सेवांसाठी फक्त १ लाख रुपयांपेक्षा जास्त पेमेंटसाठी पॅन आवश्यक असेल. लग्न आणि पार्ट्यांसारख्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये आता पूर्वीपेक्षा जास्त लवचिकता असेल.
advertisement
5/6
प्रॉपर्टी खरेदी आणि इन्शुरन्सचा हा नियम : प्रॉबर्टी खरेदी-विक्री किंवा गिफ्टचा नियमही अपडेट होत आहे. सध्या जमिन किंवा घराच्या खरेदी-विक्री, गिफ्ट किंवा जॉइंट डेव्हलपमेंट अॅग्रीमेंटमध्ये 10 लाख रुपयांहून जास्तवर पॅन द्यावा लागत होता. आता ही लिमिट 20 लाख रुपये केली आहे. लहान प्रॉपर्टी डीलमध्ये पॅनची गरज पडणार नाही. मात्र मोठ्या डीलवर नजर कायम राहील.
advertisement
6/6
विम्याचे नियम थोडे वेगळे आहेत. पूर्वी, 50 हजार रुपयांपेक्षा जास्त वार्षिक जीवन विमा प्रीमियमसाठी पॅन आवश्यक होता. आता, विमा कंपनीशी अकाउंट-बेस्ड रिलेशनशिप सुरु करण्यासाठी पॅन अनिवार्य असेल. याचा अर्थ असा की नवीन पॉलिसी सुरू करताना पॅन आवश्यक असेल.हे बदल लहान ट्रांझेक्शन लोकांसाठी सोपे करतील आणि मोठ्या ट्रांझेक्शनवर टॅक्स विभागाची नजर राहील. सामान्य लोक या नवीन नियमांना समजून आपले डॉक्यूमेंट्स तयार ठेवा. तुम्ही बँक, गाडी, हॉटेल किंवा प्रॉपर्टीशी संबंधित काम करत असाल तर हे बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
PAN Card चे नियम बदलणार! प्रॉपर्टीपासून मोठ्या देवाण-घेवाणीत कुठे गरजेचे?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल